संजय माकणे-(चाकूर तालुका प्रतिनिधी)
आज चाकुर शहरात मोकाट कुञ्याने शहरातील जवळपास पंधरा लोकांना चावा घेऊन जखमी केले.त्यामध्ये लहान बालके सुध्दा होती. याचबरोबर 7 पाळीव जनावरांचा चावा घेतला आहे. विलासराव पाटील चाकुरकर भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पार्टी चाकुर तालुका अध्यक्ष यांनी माहिती मिळताच तात्काळ ग्रामीण रूग्णालयात येऊन डॉ.लोखंडे यांच्याशी उपचारा संबंधी चर्चा केली.
वैद्यकिय अधिक्षक जितेन जैस्वाल यांच्याशी संपर्क साधला.नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रतिक लंबे यांनाही कुञ्याचा बंदोबस्त करावा म्हणून फोन वरुन सुचना दिली.
महाराष्ट्र राज्यांचे सहकार मंञी मा. ना.बाबासाहेब पाटील साहेब यांच्याशी दुरध्वनी वर संपर्क साधला.मंञी मोहदयांनी लातुर येथील आरोग्य यंञणेला तात्काळ आदेश देऊन पिसाळलेल्या कुञ्यांवरील इंजेक्शन लस लवकर उपलब्ध करण्यासाठी आदेशीत केले.