नगर / प्रतिनिधी:
शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य संस्थेची त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर येथील कोहिनूर मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी विचारपीठावर संमेलनाचे माजी स्वागताध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, संस्थापक, सचिव सुनील गोसावी, खजिनदार भगवान राऊत, प्रा.डॉ.अशोक कानडे, बाळासाहेब शेंदुरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग व जिल्हा ग्रामीण साहित्य परिषदेचे संस्थापक,ज्येष्ठ लेखक आ. य.पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलना बाबत चर्चा करण्यात आली. विविध परीक्षा समित्या गठित करण्यात आल्या. या संमेलनाच्या निमित्ताने कथालेखन, काव्य लेखन, निबंध लेखन स्पर्धा, साहित्यिक व्यक्तीचित्र स्पर्धा, पोस्टर पोएट्री स्पर्धा घेण्याचे निश्चित करण्यात आले.
यावेळी २०२५ ते २०२७ या कालावधी करिता नूतन कार्यकारी मंडळ बिनविरोध निवडण्यात आले. अध्यक्षपदी राजेंद्र उदागे तर कार्याध्यक्षपदी ज्ञानदेव पांडुळे यांची निवड करण्यात आली. इतर सविस्तर कार्यकारिणी पुढील प्रमाणे
अध्यक्ष - राजेंद्र उदागे
सचिव - सुनील गोसावी
कार्याध्यक्ष - ज्ञानदेव पांडूळे
कार्यवाह - भारत गाडेकर
राज्य संघटक - प्रा.डॉ.अशोक कानडे
उपाध्यक्ष - डॉ.जी.पी.ढाकणे
उपाध्यक्षा - जयश्री झरेकर
खजिनदार - भगवान राऊत
सह कार्यवाह - प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर
सह सचिव - स्वाती ठुबे
सह सचिव - प्रा.डॉ.अनिल गर्जे
प्रसिध्दी प्रमुख - राजेंद्र फंड
नियोजन समिती प्रमुख - बबनराव गिरी
*कार्यकारी मंडळ सदस्य*-
सुभाष सोनवणे
अरूण आहेर
रविंद्र दाणापुरे
शर्मिला गोसावी
प्रशांत सूर्यवंशी
राजेंद्र पवार
शिरीष जाधव
यावेळी राजेंद्र चोभे, मारुती खडके, त्रिंबकराव देशमुख, शिवाजी जाधव,सुरेखा घोलप, वर्षा भोईटे, जयश्री राऊत, श्यामा मंडलिक, संतोष जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौरव भूकन, दिशा गोसावी, वृषाली राऊत, हर्षली गिरी, ऋषिकेश राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी बोलताना ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, शब्दगंध ने साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वेगळा कसा उमटवलेला असून संस्थेच्या नाव लौकिकात भर घालणारी कामगिरी नव्या कार्यकारी मंडळा कडून होईल.जास्तीत जास्त नवोदितांनी सभासद व्हावे.
बाळासाहेब शेंदुरकर यांनी शब्दगंध च्या साहित्य संमेलना बाबतची भूमिका स्पष्ट करून संमेलन यशस्वी करण्याचे आवाहन केले. भगवान राऊत,शिरीष जाधव, सुभाष सोनवणे, राजेंद्र चोभे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
बैठकीचे प्रास्ताविक संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केले तर शेवटी प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी आभार मानले.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111