shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

मुख्य रस्ता मोकळा,वाहतूक सुरळीत:पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व नगरपालिका प्रशासन प्रिंट व डिजिटल मीडियाच्या भूमिकेची नागरिकांकडून प्रशंसा.

- विक्रेत्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला दिलेला सकारात्मक प्रतिसाद.    - पर्यायी जागेत आठवडे बाजाराचे व्यवस्थापन.    - वाहतूक कोंडीची समस्या सुटल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान.    - पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व नगरपालिका प्रशासनाचे प्रभावी प्रयत्न.    - प्रिंट मीडियाच्या भूमिकेची नागरिकांकडून प्रशंसा.


विक्रेत्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला दिलेला सकारात्मक प्रतिसाद.  

- पर्यायी जागेत आठवडे बाजाराचे व्यवस्थापन.  

- वाहतूक कोंडीची समस्या सुटल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान.  


- विक्रेत्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला दिलेला सकारात्मक प्रतिसाद.    - पर्यायी जागेत आठवडे बाजाराचे व्यवस्थापन.    - वाहतूक कोंडीची समस्या सुटल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान.    - पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व नगरपालिका प्रशासनाचे प्रभावी प्रयत्न.    - प्रिंट मीडियाच्या भूमिकेची नागरिकांकडून प्रशंसा.


प्रतिनिधी:- एरंडोल येथे १९ जानेवारी २०२५ रोजी आठवडे बाजाराच्या दिवशी पोलीस प्रशासनाने मुख्य रस्त्यावर धरणगाव चौफुली ते म्हसावद नाका या दरम्यान विक्रेत्यांना दुकाने न लावण्याचे केलेले आवाहन सकारात्मक ठरले. विक्रेत्यांनी याला चांगला प्रतिसाद दिल्यामुळे दिवसभर मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहिली.  


दरम्यान, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विक्रेत्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. रा.ती. काबरे विद्यालयापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, तसेच फुले-आंबेडकर व्यापारी संकुलापासून वैष्णवी हॉटेलपर्यंत आठवडे बाजार व्यवस्थितपणे भरवण्यात आला. बाजार ओटा स्थळावर देखील विक्रेत्यांनी आपली दुकाने लावली होती. या व्यवस्थेमुळे आठवडे बाजारात सुधारणा व शिस्त जाणवली.  

नगरपालिकेने आठवडे बाजारासाठी स्थायी ओटे बांधले आहेत. मात्र, यापूर्वी विक्रेते मुख्य रस्त्यावर दुकाने लावत असल्याने जड वाहनांसह इतर वाहतुकीस अडथळा निर्माण होत असे. यामुळे नागरिक व विक्रेत्यांमध्ये अस्वस्थता होती. प्रिंट मीडियाने या समस्येवर प्रकाश टाकल्यानंतर पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी योग्य पावले उचलली. यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली आणि बाजारालाही शिस्त लागली.  

नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत पोलीस व नगरपालिका प्रशासनाचे आभार मानले. याशिवाय, प्रिंट मीडियाच्या सकारात्मक भूमिकेबद्दलही नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली.  

close