दापोडी:-
पुणे येथील जनता शिक्षण संस्थेचे श्रीमती सी. के. गोयल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (N.S.S )विभागाचे विशेष "श्रमसंस्कार शिबिर "खेड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील चिंचबाई वाडी येथे ५ जानेवारी २०२५ ते दि.११ जानेवारी २०२५ या कालावधीत अतिशय उत्साहात संपन्न झाले.
शिबिराचे उद्घाटन: रविवार दि.५ जानेवारी रोजी सायंकाळी ४:००वाजता संपन्न झाले. उद्घाटन कार्यक्रमासाठी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, अन्य प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
शिबिरामध्ये शिबिर कालावधीत सकाळ सत्रात-प्रार्थना, योगा, ध्यानधारणा,श्रमदान दुपार सत्रात- व्याख्यानमाला, खेळ, गटचर्चा,संध्याकाळच्या सत्रात-सांस्कृतिक कार्यक्रम असा दिनक्रम होता.
शिबिरात खालील उपक्रम राबविण्यात आले.
१) श्रमदान-
अ) परिसर स्वच्छता:
शिबिर कालावधीत दररोज सकाळी ८ ते१२ या वेळेत श्रमदान अंतर्गत विविध कामे करण्यात आले. त्यामध्ये गावातील सर्व मंदिरे धुवून स्वच्छ करून, साफ करण्यात आली, चावडी, प्राथमिक शाळा, स्मशानभूमी, ग्रामपंचायत परिसर, गावातील मुख्य रस्ते, पाण्याच्या टाकीचा परिसर, अंगणवाडी परिसर, या सर्व ठिकाणी झाडलोट करून परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच या परिसरातील गाजर गवत काढणे रस्त्यावर मुरूम टाकणे, प्लास्टिक केरकचरा निर्मूलन करणे अधिक कामे करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण गाव श्रमदानाच्या माध्यमातून चकाचक होण्यास मदत झाली.
ब) वृक्ष लागवड: शिबिर कालावधीत" मिया वाकी"प्रकल्प अंतर्गत घनवन लागवड प्रकल्प राबविण्यात येत असून त्या अंतर्गत युवा मित्र संघटनेच्या सहकार्याने ८२० वृक्षांची लागवड करण्यात आली. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त स्थानिक प्रजातीची झाडे या प्रकल्पांतर्गत लावली जातात. गावातील 400 चौरस मीटर क्षेत्रात एकूण ८2 जातीच्या८२० वृक्षांची लागवड गांडूळ खत टाकून करण्यात आली. ही झाडे जगवण्याची जबाबदारी युवा मित्र संघटनेने घेतली आहे.
क) जलसंधारण बंधारा: श्रमदान अंतर्गत गावातील ओढ्यावर वनराई बंधारा, मुरूम माती टाकून करण्यात आला. त्यामुळे पाणी आडवा पाणी जिरवा हा संदेश ग्रामस्थांपर्यंत जाण्यास मदत झाली .असून पावसाळ्यात पाणी आणून शेतीसाठी त्याचा उपयोग होणार आहे.
क) शोष खड्डे: गावात वेगवेगळ्या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी शोषखड्डे घेण्यात आले.
२) दुपार सत्रात: व्याख्यानमाला
शिबिर कालावधीत दररोज दुपारी २ ते४ या वेळेत विविध विषयांवर प्रबोधन , उद्बोधन पर व्याख्यानमाला संपन्न झाली-त्यामध्ये श्री.संपतराव गारगोटे (छत्रपती शिवाजी महाराज), श्री.प्रशांत कुंजीर-(विनोदी कथाकथन),डॉ. अंकुश काळे आणि प्रा.किरण मडावी(डिजिटल लिटरसी) डॉ .ज्योती लेकुळे आणि प्रा. चंद्रभागा उघडे, प्रा.कपिलकांबळे(शिवार फेरी) कु. दीक्षा शिंदे (मी सावित्रीबाई फुले बोलते !एक पात्री प्रयोग) श्री .मयूर दौंडकर (उद्योजकता विकास) यांची व्याख्याने संपन्न झाली.
३)सायंकाळच्या सत्रात: सांस्कृतिक कार्यक्रम मनोरंज, उद्बोधन कार्यक्रम
शिबिर कालावधीतदररोज संध्याकाळी ७:३० ते ९:३० या वेळेत विविध मनोरंजन प्रबोधन, उद्बोधन, पर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. श्री. संपत गारगोटे-छत्रपती शिवाजी महाराज यावर व्याख्यान, मुक अभिनय नाट्य,समाज प्रबोधन पर प्रसंग नाट्य-अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण जागृती, व्यसनमुक्ती, हुंडाबळी, महिला सबलीकरण, साक्षरता, निर्भय कन्या, डिजिटल लिटरसी, यासारख्या विषयांवर प्रसंगण नाट्य सादर करण्यात आला. "संमोहन"आगळावेगळा नाविन्यपूर्ण कार्यक्रम श्री. मुकुंदजी देंडगे यांनी सादर केला. शिबिरार्थी विद्यार्थ्यांची ग्रुप डान्स वैयक्तिक डान्स (लोकनृत्य) गावातील जि. प. शाळा, अंगणवाडी, जि. प .शाळा निघोजे, या शालेय विद्यार्थ्यांचे व गावकऱ्यांचे सांस्कृतिक, कार्यक्रम, शिबिरार्थींचा मॉडेल्स हा आगळावेगळा कार्यक्रम,ग्रामस्थांच्या वतीने आयोजित"खेळ रंगला पैठणीचा"-सादर करते-श्री. बाजीराव काळे आणि श्री.सुनील वाघ हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला ग्रामस्थांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
४) आरोग्य शिबिर:
शिबिर कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्र वाफगाव यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी, औषधोपचार, हिमोग्लोबिन तपासणी व क्षयरोग तपासणी आणि निर्मूलन कार्यक्रम संपन्न करण्यात आला. या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून १५० पेक्षा अधिक लोकांची तपासणी करण्यात आली.
५) समाज जागृती प्रभात फेरी:
शिबिराच्या समारोप कार्यक्रमाच्या आधी सकाळी ८ ते ९:३० या वेळेत संपूर्ण गावात प्रबोधन पर घोषणा देत प्रभात फेरी आयोजित करण्यात आली. गाडगे बाबांच्या वेशात (प्रतिकृती) श्री.करण रेड्डी हा स्वयंसेवक हुभेहुभ गाडगे बाबांचा फेराव करून फेरीच्या पुढे सामील झाला होता. ढोल, ताशा, लेझीम, या वाद्यांच्या गजरात संपूर्ण गावात घोषणा देत प्रभात फेरी संपन्न झाली. झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छ करा स्वच्छ करा परिसर आपला स्वच्छ करा, मुलगा मुलगी एक समान दोघांनाही शिकवा छान, बसू नका बसू नका उघड्यावर सौच्याला बसू नका, पाणी आडवा पाणी जिरवा, यासारख्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
६) परिसर पाहणी, शिवार फेरी:
गावातील प्रसिद्ध ठिकाणांनाची माहिती घेण्यासाठी "शिवार फेरी"- परिसर पाहणीचे आयोजन करण्यात आले. स्वयंसेवकांनी शेती, पिके, शेती जोडधंदे, या विषयी माहिती घेतली. तसेच प्रत्यक्ष शेती कामाचे अनुभवी घेतले.
७) ग्रामसर्वे:
शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी गावाची सर्वांगिण पाहणी करून घरोघरी जाऊन, आरोग्य, पाणीपुरवठ्याची सुविधा, आर्थिक स्तर, लोकजीवन, शेती, पिके, जोडधंदी, गावचा इतिहास, धार्मिक बाबतीत माहिती संकलित केली.
८) शिबिराचा समारोप:
दि. ११जानेवारी रोजी सकाळी ९;३० वाजता शिबिराचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. जयप्रकाश जी जगताप हे होते. कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.सुभाष सूर्यवंशी, संतोष गार्डी (मा.सरपंच), बाळासाहेब रणपिसे (ग्रामपंचायत सदस्य), शांताराम गार्डी (मा. सरपंच), विजय रणपिसे, योगेश रणपिसे, ता तान्हाजी रणपिसे, मयूर गाडी, मनीषा गार्डी, सुरेश रणपिसे, पदमा सातकर, संदीप ढेरंगे, गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, महिला, पुरुष, तरुण कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी शिबिरार्थींचा यथोचित सन्मान करून कौतुक केले.
शिबिरामध्ये लोकसंख्या नियंत्रण जनजागृती, विविध विषयांवरसमाज प्रबोधन अभियान, महिला सक्षमीकरण, आरोग्य जागृती, ग्रामस्वच्छता, पर्यावरण जागृती, अन्नसुरक्षा जागृती, वृक्षारोपण, ग्रामसर्वे, निर्मलग्राम, डिजिटल लिटरसी, मनोरंजन, योगा, प्रार्थना ध्यानधारणा, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध अंगी कार्यक्रमाची राबविण्यात आले.
शिबिराचे संयोजन: प्राचार्य डॉ. सुभाष सूर्यवंशी,राष्ट्रीय सेवा योजने विभाग प्रमुख प्रा.डॉ. बाळासाहेब माशेरे, सिद्धार्थ कांबळे, डॉ. अंकुश काळे,डॉ.ज्योती लेकुळे, चंद्रभागा उघडे, आणि विद्यार्थी प्रतिनिधींनी दीक्षा गायकवाड, आफ्रीनबेग, सुनील आमले , पल्लवी वाडेकर, सुनील वावळे, यांनी केले.
शिबिराचे शेवटी ग्रामस्थांनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या मासवडीचे स्वादिष्ट भोजन शिबिरार्थींना दिले.