shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

एरंडोल नगरपरिषदेचे "माझे एरंडोल, स्वच्छ एरंडोल"-संकल्प हाती महास्वच्छता अभियानाने घेतला वेग स्वच्छता दूतांचाही सत्कार .

मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली १५ दिवसांचे स्वच्छता अभियान यशस्वी...
एरंडोल नगरपरिषदेचे "माझे एरंडोल, स्वच्छ एरंडोल"-संकल्प हाती महास्वच्छता अभियानाने घेतला वेग.

"माझे एरंडोल, स्वच्छ एरंडोल" – संकल्प हाती..
महास्वच्छता अभियानाच्या निमित्ताने स्वच्छता निरीक्षक जीवन बाबुराव जाधव, आरोग्य निरीक्षक अनिल महाजन, शहर समन्वयक विवेक कोळी आणि संपूर्ण स्वच्छता पथकाने "माझे एरंडोल, स्वच्छ एरंडोल" हा संकल्प हाती घेतला आहे.

 

एरंडोल नगरपरिषदेचे "माझे एरंडोल, स्वच्छ एरंडोल"-संकल्प हाती महास्वच्छता अभियानाने घेतला वेग.

एरंडोल (प्रतिनिधी) – नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने एरंडोल नगरपरिषदेतर्फे १ जानेवारी २०२५ ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान १५ दिवसीय महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. मुख्याधिकारी अमोल बागुल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान प्रभावीपणे पार पडले असून, संपूर्ण शहरात स्वच्छतेची चळवळ उभारण्यात आली आहे.

एरंडोल नगरपरिषदेचे "माझे एरंडोल, स्वच्छ एरंडोल"-संकल्प हाती महास्वच्छता अभियानाने घेतला वेग.

या मोहिमेअंतर्गत शहरातील १० वॉर्डांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रत्येक वॉर्डातील गटारांमधून गाळ काढून ते संपूर्ण स्वच्छ करण्यात आले. तसेच, शहरातील मुख्य चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे यांची विशेष स्वच्छता करण्यात आली. जिथे घनकचऱ्याचे ढीग साचले होते किंवा अस्वच्छता होती, ती ठिकाणे पूर्णपणे स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करण्यात आले.

एरंडोल नगरपरिषदेचे "माझे एरंडोल, स्वच्छ एरंडोल"-संकल्प हाती महास्वच्छता अभियानाने घेतला वेग.

नदी स्वच्छतेला विशेष प्राधान्य...

नगरपरिषदेच्या महास्वच्छता मोहिमेअंतर्गत नदी स्वच्छता अभियानालाही विशेष महत्त्व देण्यात आले. गावातील मुख्य नदी व तिला जोडणाऱ्या नाल्यांतील गाळ आणि कचरा काढण्याचे काम हाती घेण्यात आले. यामध्ये आतापर्यंत सुमारे १० ट्रॅक्टर गाळ नदीतून काढण्यात आला आहे. यामुळे नदीपात्र स्वच्छ व खुलं होण्यास मदत झाली आहे.

एरंडोल नगरपरिषदेचे "माझे एरंडोल, स्वच्छ एरंडोल"-संकल्प हाती महास्वच्छता अभियानाने घेतला वेग.

५५ ट्रॅक्टर गाळ गटारीतून हटविला...

महास्वच्छता अभियानाच्या १५ दिवसांच्या कालावधीत शहरातील गटारीतून तब्बल ५५ ट्रॅक्टर गाळ काढून टाकण्यात आला आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नगरपरिषदेच्या स्वच्छता दूतांनी अविरत परिश्रम घेतले.

एरंडोल नगरपरिषदेचे "माझे एरंडोल, स्वच्छ एरंडोल"-संकल्प हाती महास्वच्छता अभियानाने घेतला वेग.

फवारणी आणि निर्जंतुकीकरण मोहिम...

संपूर्ण शहरात स्वच्छतेसह फवारणी आणि निर्जंतुकीकरणाचे कामही मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठा, शाळा, बसस्थानक आणि इतर गर्दीच्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवून सफाई कर्मचारी आणि नागरीकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.

एरंडोल नगरपरिषदेचे "माझे एरंडोल, स्वच्छ एरंडोल"-संकल्प हाती महास्वच्छता अभियानाने घेतला वेग.

स्वच्छता दूतांचा सत्कार आणि वृक्षारोपण उपक्रम...

या अभियानात शहरातील सर्व स्वच्छता दूतांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी विशेष सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभात स्वच्छता दूतांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण मोहीमही हाती घेण्यात आली असून, प्रत्येक वॉर्डात झाडे लावली जात आहेत.


"माझे एरंडोल, स्वच्छ एरंडोल" – संकल्प हाती..

महास्वच्छता अभियानाच्या निमित्ताने स्वच्छता निरीक्षक जीवन बाबुराव जाधव, आरोग्य निरीक्षक अनिल महाजन, शहर समन्वयक विवेक कोळी आणि संपूर्ण स्वच्छता पथकाने "माझे एरंडोल, स्वच्छ एरंडोल" हा संकल्प हाती घेतला आहे.

स्वच्छता निरीक्षक जीवन जाधव यांनी सर्व एरंडोलकर नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपले शहर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्यास मदत करावी, असे आवाहन केले आहे.

एरंडोलकरांनी मोहिमेचे केले स्वागत...

महास्वच्छता अभियानामुळे शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली असून, अनेक स्थानिक नागरिकांनी नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे. भविष्यातही अशीच स्वच्छता मोहीम सातत्याने राबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.



close