नगर / प्रतिनिधी:
सध्याची तरुण पिढी समाज माध्यमे तसेच चंगळवादी सामाजिक विकृतीमुळे व्यसनाधीन झाल्याचे चिंताजनक वास्तव आहे. यामुळे विद्यार्थी वर्ग तसेच तरुण पिढीने आपले भवितव्य घडविण्यासाठी व्यसनमुक्त असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नगर येथील प्रसिध्द व्यसनमुक्ती चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार मास्टर निसार यांनी मुंबई येथील भरगच्च कार्यक्रमात केले.
जहांगीर आर्ट गॅलरी महात्मा गांधी रोड, मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार, इंडियाचे समाचार डिजीटल मिडियाचे प्रतिनिधी आर. के. शिवा यांनी नवीन वर्षानिमित्त व्यसनमुक्ती कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात बोलतांना मास्टर निसार म्हणाले,अंमली पदार्थ, धुम्रपान,मद्यपान, यामुळे शारिरीक आरोग्या बरोबरच मानसिक आरोग्य देखील उध्दवस्त होते. सध्या ही मोठी सामाजिक समस्या निर्माण झालेली आहे. व्यसनमुक्तीबाबत सर्व पातळीवर प्रबोधन होणे महत्वाचे आहे.
या कार्यक्रमात तरुण तसेच विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्याक्रमात शेवटी राजू कदम यांनी आभार मानले.
*वृत विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार जी.एन.शेख - अ.नगर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111