पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. पाकचा ३८ वर्षीय फिरकी गोलंदाज नोमान अलीने मुलतानमधील सलग दुसऱ्या कसोटीत इतिहास रचला. पाकिस्तानसाठी कसोटीत हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला फिरकी गोलंदाज ठरला. मुलतान कसोटीच्या पहिल्या दिवशी त्याने हा विक्रम केला. पाकिस्तानने मुलतानमध्येच खेळली गेलेली पहिली कसोटी १२७ धावांनी जिंकली होती आणि आता दुसऱ्या कसोटीतही पाकिस्तानने आपला दबदबा कायम ठेवला आहे.
वास्तविक, दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पहिल्या सत्रातच पाकिस्तानी गोलंदाजांनी वेस्ट इंडिजची कोंडी केली. वेस्ट इंडिजने पहिल्या ११ षटकांत ३७ धावांत चार विकेटस गमावल्या. कर्णधार क्रेग ब्रॅथवेट नऊ धावा केल्यानंतर, मायकेल लुईस चार धावा करून बाद झाले, तर आमिर जांगो आणि ॲलेक अथानाजे खातेही उघडू शकले नाहीत. डावाच्या बाराव्या षटकात नोमानने पहिल्या तीन चेंडूत तीन बळी घेत हॅट्रीक साधल्याने वेस्ट इंडिज संघाच्या अडचणीत आणखी वाढ झाली.
नोमान अलीने षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जस्टिन ग्रीव्हजला बाबर आझमकरवी झेलबाद केले. त्याला एक धाव करता आली. यानंतर पुढच्याच चेंडूवर टेविन इम्लाच पायचित झाला, त्याला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर केविन सिंक्लेअरला बाबरने झेलबाद केले. सिंक्लेअरलाही खाते उघडता आले नाही. अशाप्रकारे, कसोटीत हॅट्रीक घेणारा नोमान हा पाकिस्तानचा पहिला फिरकी गोलंदाज आणि एकूण पाचवा गोलंदाज ठरला. त्याच्या आधी वासिम अक्रम (दोनदा), मोहम्मद सामी, अब्दुल रज्जाक आणि नसीम शाह यांनी ही कामगिरी प्रत्येकी एकदा केली आहे. हे सर्व वेगवान गोलंदाज आहेत. पाकिस्तान सन १९५२ पासून कसोटी क्रिकेट खेळत आहे आणि ७२ वर्षात पहिल्यांदाच पाकिस्तानच्या कोणा फिरकीपटूने कसोटीत हॅट्रीक घेतली.
कसोटी क्रिकेट में पाकिस्तानकडून हॅट्रीक घेणारे गोलंदाज
गोलंदाज वर्ष स्थान विरोधी संघ
वासिम अक्रम १९९९ लाहोर श्रीलंका
वासिम अक्रम १९९९ ढाका श्रीलंका
अब्दुल रज्जाक २००० गॉले श्रीलंका
मोहम्मद सामी २००२ लाहोर श्रीलंका
नसीम शाह २०२० रावलपिंडी बांगलादेश
नोमान अली 2025 मुल्तान वेस्टइंडीज
याशिवाय नोमानने कर्णधार क्रेग ब्रॅथवेटलाही बाद केले. हा लेख लिहीला जात असेपर्यंत त्याने पाच बळी घेतले आहेत. याशिवाय दुसरा फिरकीपटू साजिद खानने २, तर काशिफ अली आणि अबरार अहमदने प्रत्येकी एक विकेट घेतली. वेस्ट इंडिजने १३८८ धावांवर नऊ बळी गमावले होते. गुडशेक मोती व केमार रोचने ९ बाद ९५ वरून विंडीजचा डाव काहीसा सावरला आहे.
मागील सप्टेंबर महिन्यापासून पाकिस्तानी क्रिकेटमध्ये सुगीचे दिवस आले असून मायदेशात बांगलादेशकडून हसल्यानंतर त्यांनी कसोटीत बलाढ्य इंग्लंडला २-१ असे लोळविले तर सध्याची मालिकाही २-० अशी ते जिंकणार हे उघड आहे. झिंबाब्वेत वनडे, टि२० मालिका जिंकली, ऑस्ट्रेलियात टि२०, तर दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिक क्लिन स्विप करत खिशात घातली. या उलट भारताची सरळ चाललेली विजयाची गाडी वनडेत कोलमडली तर कसोटी प्रारूपात रूळावरूनच भरकटली.आगामी चॅमियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने पाकिस्तान क्रिकेटचा आत्मविश्वास वाढविणारी सदर कामगिरी असून त्यांचे बहुतांश सामने मायदेशातच होणार असल्याने त्यांच्या सेमीफायनलपर्यंत पोहोचण्याच्या आशा रुंदावल्या आहेत.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२