shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

चिमनपुरी पिंपळे: प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन.

चिमनपुरी पिंपळे: प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन.

प्रतिनिधी पिंपळे
:- चिमनपुरी पिंपळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा आणि कै. सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
चिमनपुरी पिंपळे: प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन.

 ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम सीमा सुरक्षा दलाचे मंगेश बाबूलाल पाटील आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजू भावराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खु येथे उपसरपंच शोभाबाई गोकुळ पाटील आणि पिंपळे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सौ. दगुबाई भीमराव पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे उपक्रम.

पिंपळे येथील सेवानिवृत्त मंडळ अधिकारी डी. आर. पाटील आणि प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या स्वयंसेवकांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, शिक्षक, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चिमनपुरी पिंपळे: प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन.

सांस्कृतिक कार्यक्रम आणि संविधान वाचन.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान वाचून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीतं, नृत्य आणि भाषणांनी उपस्थितांचे मन जिंकले.

चिमनपुरी पिंपळे: प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन.

कार्यक्रमात सहभाग.

कार्यक्रमात मराठी शाळेचे मुख्याध्यापक राजू पाटील, उपशिक्षक सुनील दौलत वाघ, इसाक मगण मावची, मीना अभिमान सोनवणे, वंदना भालचंद्र पाटील, दर्शना देवीदास पाटील, वैशाली भाऊसाहेब देवरे, भारती पाटील आणि इतर शिक्षकांनी सहभाग घेतला. माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय भोसले आणि ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत पाटील, मधुकर निकम, गोपाल पाटील, राहुल पाटील, शिरसाठ मॅडम तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी अशोक मोरे, अंकुश पाटील, भाऊसाहेब अहिरे यांनी सहकार्य केले.

ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा सहभाग.

ग्रामपंचायतीचे प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील, माजी सरपंच योगेश अशोक पाटील, उपसरपंच शोभाबाई गोकुळ पाटील, सदस्य अरुण संभाजी पाटील, संतोष बापू चौधरी, कल्पना साहेबराव पाटील, मिनाबाई सतीश पाटील, जयश्री सुदाम पाटील यांची उपस्थिती होती.

महिला बचत गटाच्या अध्यक्ष स्वाती पाटील, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवक किरण लंकेश, ग्रामपंचायत शिपाई सुनील पाटील, रोजगार सेवक संतोष पाटील, तसेच सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील आणि ग्रामस्थ माता-भगिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाल्या.कार्यक्रमाने प्रजासत्ताक दिनाचा उत्साह विद्यार्थ्यांना  देशसेवेचे महत्त्व समजावून देण्याचा प्रयत्न केला.



close