सावित्रीमाई फुले यांच्यामुळे आजच्या स्त्रियांना स्वातंत्र्य आहे - आबीद खान
नगर/ प्रतिनिधी:
सावित्रीमाई फुले यांचा वयाच्या आवघ्या नवव्या वर्षीच विवाह झाला व त्यांना पती ज्योतीबा फुले यांनी विवाहानंतर शिक्षण दिले. त्याच पुढे जाऊन स्त्री शिक्षणाच्या जनक ठरल्या. त्याकाळी स्त्रियांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन फार संकुचित होता. अशा काळात त्यांनी स्त्रियांना शिक्षणासाठी प्रेरित केले. त्यामुळेच आजच्या स्त्रिया स्वातंत्र्य उपभोगत आहेत, परंतु काय खर्या अर्थाने स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन समाजामध्ये खरोखरच बदलाल आहे का ? हा विचार समाजातील प्रत्येकाने करण्याची आज नितांत गरज असल्याचे प्रतिपादन मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी केले.
स्त्री शिक्षणाच्या अद्यपर्वतक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी अहमदनगर तर्फे भिंगार येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या महात्मा गांधी उर्दू स्कूल मध्ये त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. व विद्यार्थ्यांना मोफत बाल साहित्याची पुस्तके आबीद दुलेखान यांच्या हस्ते वाटप करण्यात आली. यावेळी विद्यार्थिनींनी सावित्रीमाई फुले यांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या प्रसंगाचे माहिती आपल्या वक्तृत्वाद्वारे सादर केली.याप्रसंगी मुबीना बाजी, सुमैया सैय्यद आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना आबीद खान म्हणाले की, त्या काळी स्त्रीयांबद्दल जी भावना समाजामध्ये होती तीच भावना आजपण समाजामध्ये रुप बदलून वावरत आहे. स्त्रीया आज शिक्षित झाल्या, मोठमोठ्या पदावर पोहचल्या तरी त्यांना आज व्यक्ती स्वातंत्र्य असल्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे. परंतु आता समाजाने हा दृष्टीकोन बदलून स्त्रीयांना सन्मान मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुबीना बाजी यांनी केले. तर आभार सुमैया सैय्यद यांनी मानले. यावेळी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111