एरंडोल प्रतिनिधी– एरंडोल तालुका पत्रकार संघाच्या वतीने ६ जानेवारी २०२५ रोजी संघाच्या कार्यालयात राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष बी.एस. चौधरी सर होते. यावेळी प्रा. शरद महाजन, चंद्रभान पाटील, प्रल्हाद पाटील, देविदास सोनवणे, शहराध्यक्ष कैलासभाऊ महाजन, प्रा. नितीन पाटील, राजधर महाजन, पंकज महाजन, प्रमोद चौधरी, कुंदन ठाकूर, शैलेश चौधरी, विकी खोकरे, नितीन ठक्कर, उमेश महाजन, तुषार शिंपी, स्वप्निल बोरसे, विज्ञान पाटील आदी मान्यवर पत्रकार उपस्थित होते.
तसेच अजय महाजन, गोरख चौधरी, गुलाब महाजन, शरद पवार यांनीही उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमात पत्रकारितेचे महत्त्व, समाजातील पत्रकारांचा जबाबदारीपूर्ण वाटा आणि सत्यनिष्ठेने पत्रकारिता करण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.