shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

४ जानेवारीस इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार प्रदान समारंभ


सातारा / प्रतिनिधी:
रयत शिक्षण संस्थेचे माजी मानद सचिव पै. इस्माईलसाहेब मोहम्मदसाहेब मुल्ला यांच्या ५१ व्या पुण्यतिथी निमित्त इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने शनिवार  दिनांक ०४ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वा. संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा या महाविद्यालयात आयोजित केला जाणार आहे.

    महाराष्ट्राच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती मा.डॉ. शिवाजीराव कदम यांना ‘पै. इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार’ महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक मा.डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. एक लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमास संस्थेचे व्हा. चेअरमन मा. ॲड. भगीरथ शिंदे, संस्थेचे संघटक मा. डॉ. अनिल पाटील, संस्थेचे कायदा सल्लागार मा. ॲड. दिलावरसाहेब मुल्ला, मुल्ला कुटुंबीय, संस्थेचे इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सातारा शहरातील शिक्षण प्रेमींनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे सचिव मा. विकास देशमुख यांनी केले आहे.

*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
close