shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वी इंग्लंड भारताविरुध्द करणार दोन हात


                येत्या १९ फेब्रुवारीपासून आयसीसीची चॅम्पियन्स ट्रॉफी हि आठ अव्वल देशांचा सहभाग असलेली एकदिवसीय सामन्यांची मिनिविश्वचषक स्पर्धा पाकिस्तानव दुबईत हायब्रीड मॉडेल पद्धतीने होणार आहे. त्यासाठी प्रत्येक सहभागी देश आपापल्या पध्दतीने तयारीला लागले असून चाळीस दिवसात प्रत्येक संघ विजेतेपद मिळविण्यासाठी इतर वेगवेगळ्या सराव सामन्यातून अजमवार हे नक्की ! त्याचाच भाग म्हणून इंग्लंडचा वनडे व टि२० संघ भारत दौऱ्यावर येत आहे. यातून दोन्ही संघाना योग्य तो सराव मिळेलच पण क्रिकेट दिवाण्यांना एका अति सुंदर मेजवानीचाही लाभ होणार असून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मिळालेल्या दुःखद आठवणी विसरण्याचं काम इंग्लंडविरूध्दची मालिका करेल व त्या गोष्टीचा नैतिक लाभ टिम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळताना नक्कीच होऊ शकेल.

             चॅम्पियन्स ट्रॉफी वनडे सामन्यांची असली तर इंग्लिश संघ वनडेचे तीन व टि२०चे सामने भारतात खेळणार आहेत. सर्वप्रथम २२ जानेवारी पासून पाच टि२० सामन्यांच्या मालिकेने आरंभ होईल तर तीन वनडे सामन्यांची मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू होईल तिचा खऱ्या अर्थाने लाभ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी दोन्ही संघाना होईल.  भारत व पाकिस पाकिस्तानातील वातावरण काहीसं सारखंच असल्याने इंग्लंडला वातावरणाशी जुळवून घेण्यास त्याचा मोठा लाभ होणार आहे.

             इंग्लंड क्रिकेटचा जन्मदाता देश असला तरी भारत आजमितीला क्रिकेटचा सर्वात शक्तिशाली व मुख्य आश्रयदाता देश आहे. शिवाय १५० कोटींच्या भारतील क्रिकेटप्रेमी सर्व प्रकारच्या क्रिकेटवर भरभरुन प्रेम करत असल्यामुळे या मालिकेलाही मोठा प्रतिसाद मिळणार यात तिळमात्र शंका नाही. या दौऱ्यात इंग्लत भारतासोबत पहिल्यांदा टि२० मालिकेने श्रीगणेशा करणार असल्याने सदर संघात यापूर्वी खेळलेल्या टि२० मालिकेतील ठळक घड़ामोडींचा आढावा प्रस्तुत लेखात घेणार आहोत.

            क्रिकेटच्या बाबत बोलायचे ठरलेल दोन्ही संघटि२०मध्ये तुल्यबळ आहेत. भारत सध्या टि२०चा विश्वविजेता आहे, शिवाय सदर मालिका भारतात होणार असल्याने भारताचे पारडे जड राहण्याची शक्यता असून पूर्व इतिहासही तेच संकेत देत असून आजतागायत टि२० प्रारूपात भारतानेच इंग्लंडवर वर्चस्व गाजविले आहे. सदर मालिकेसाठी इंग्लंडने आपले दोनही संघ जाहिर केले असून टिम इंडियाही येत्या काही दिवसात आपले संघ जाहिर करतील.

                 भारत आणि इंग्लंडमध्ये आतापर्यंत २४ टि२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी टिम इंडियाने तेरा, तर इंग्लंडने ११ सामने जिंकले आहेत.  टिम इंडियाने इंग्लंडला घरच्या मैदानावर सहा वेळा पराभूत केले आहे, तर इंग्लंडमध्ये चार सामने जिंकले आहेत.  भारताने तटस्थ ठिकाणी इंग्लंडचा तीनदा पराभव केला आहे. 

                जर आपण इंग्लंडबद्दल बोललो, तर अकरा जिंकलेल्या सामन्यांपैकी इंग्लंडने घरच्या मैदानावर पाच सामने जिंकले आहेत, तर ५ सामने भारतात जिंकले आहेत. इंग्लंडच्या संघाने तटस्थ ठिकाणी एक सामना जिंकला आहे.  म्हणजेच नीट बघितले तर फरक फारसा दिसत नाही.  फक्त काही सामन्यांचे अंतर आहे, जे केव्हाही भरून निघेल.  या मालिकेत पाच सामने खेळले जातील, ज्यात हा फरक मोठ्या प्रमाणात बदलण्याची क्षमता आहे. 

              भारत आणि इंग्लंडचे संघ प्रदीर्घ काळानंतर एकमेकांविरुद्ध टि२० मालिका खेळणार आहेत.  यापूर्वी सन २०२२ मध्ये तीन टि२० सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही टि२० सामने खेळवले गेले आहेत.  दरम्यान, सध्या कोणतीही मोठी टि२० स्पर्धा नाही, पण तरीही ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. कारण दोन्ही संघांना त्यांच्या नवीन आणि युवा खेळाडूंना संधी द्यायची आहे आणि ते कशी कामगिरी करतात ते पाहायचे आहे.जेणे भविष्यातील संघ बांधणीसाठी लाभ होईल व आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी या मालिकेत केलेल्या चांगल्या कामगिरीचा नैतिक लाभ होईल.

              कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे टि२० मालिकेचे सामने होणार आहेत.  तर एकदिवसीय सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे होणार आहेत.  २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान टि२० मालिका होणार आहे.  यानंतर ६ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान वनडे मालिका खेळवली जाईल.  टि२० मालिकेचे सामने संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील. तर एकदिवसीय मालिकेतील सामने दुपारी १.३० वाजता सुरू होतील. 

भारत आणि इंग्लंड टि२० मालिकेचे वेळापत्रक 

२२ जानेवारी- पहिला टि२० सामना - कोलकाता.
२५ जानेवारी - दुसरा टि२०, चेन्नई.
२८ जानेवारी- तिसरा टि२० राजकोट
३१ जानेवारी- चौथा टि२०, पुणे 
२ फेब्रुवारी – पाचवा टी२०, मुंबई

भारत आणि इंग्लंड एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक 

६ फेब्रुवारी – पहिला वनडे, नागपूर.
९ फेब्रुवारी - दुसरा वनडे, कटक.

१२ फेब्रुवारी- तिसरा वनडे अहमदाबाद.

भारताविरुद्ध इंग्लंडचा टि२० संघ असा असेल - जोस बटलर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), फिल सॉल्ट, जेमी स्मिथ, हॅरी ब्रूक, बेन डकेट, जेकब बिथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, रेहान अहमद, जेमी ओव्हरटन, ब्रेडन कार्स, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड आणि साकिब महमूद.  

भारताबरोबर इंग्लंडचा वनडे संघ असा आहे - 

जोस बटलर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), फिल सॉल्ट, जेमी स्मिथ, हॅरी ब्रूक, बेन डकेट, जो रूट, जेकब बिथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, ब्रेडन कारसे, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड आणि साकिब महमूद. 

लेखक : - 
डॉ.दत्ता विघावे                        
क्रिकेट समिक्षक 
मो. क्रं - ९०९६३७२०८२
close