एरंडोल– येथील विवेकानंद केंद्र,योगेश्वर नागरी पतसंस्था,आणि माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊ जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
*तारीख:*१२ जानेवारी २०२५, रविवार
*वेळ:*सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.००
*स्थळ:*रा.ति.काबरे विद्यालय, एरंडोल
आयोजक प्रा. जी.आर. महाजन, प्रसाद दंडवते, नरेश डागा, व मंगेश पाटील यांनी युवक, युवती आणि सर्व रक्तदात्यांना या राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
रक्तदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा आहे. त्यामुळे इच्छुकांनी शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक योगदान द्यावे.