shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

कडवं सत्य..!

 कितीही पैसे द्या कामवाली घरच्यासारखं झाडत नाही आणि पोळीवालीही घरच्यासारख्या पोळ्या करत नाही.

  आईवडिलांसारखी छाया नाही आणि भावंडांसारखी माया नाही!

  हॉटेलच्या बिर्याणीला घरच्या खिचडीची चव नाही आणि कितीही यूट्यूब बघा,थिएटरची सर नाही.

   साडीतलं सौदर्य कुठल्याच पोशाखात नाही आणि कितीही मेकअप करा साधेपणासारखं सौदर्य नाही!

   कितीही कलमं करा,गावठी गुलाबाला तोड नाही आणि कितीही अत्तरं आणा जाई,जुई आणि मोगऱ्याची सर नाही.

   शेताची सर बागेला नाही आणि बागेची सर टेरेसला नाही.

  भाजीभाकरीची चव पिझ्झा बर्गरला नाही आणि क्रीडांगणाची सर जिमला नाही.

   स्वतः सांगितल्याशिवाय प्रेमासारखं निरागस प्रेम नाही आणि  जीवनांत प्रेम करणा-या जोडीदारासारखा दुसरा आधार नाही.

   कितीही टॅली वापरा त्याला खतावणीची सर नाही आणि पावकी-निमकीची मजा कॅलक्युलेटरला नाही.

   कितीही परिश्रम करा दैवाशिवाय काही मिळत नाही आणि कितीही हुशार असा ईश्वरापुढं कुणाचंच काही चालत नाही.

   कितीही पाणी द्या पावसाशिवाय झाड काही खुलत नाही,कितीही पैसे असु द्या पण माणसांशिवाय काही भागत नाही.

खरं प्रेम केल्याशिवाय प्रेमाची गोडी समजत नाही,आपल्या आवडत्या व्यक्तिबरोबर बोलल्याशिवाय मन मोकळं होत नाही.

   अनुभवासारखा शिक्षक नाही आणि जगल्याशिवाय आयुष्य समजतच नाही.

   मुलांशिवाय घराला शोभा नाही आणि नातवंडासारखा परमानंद जगात नाही!

   शालीनतेसारखा दागिना नाही आणि झोपडीतलं प्रेम बंगल्यात नाही.

  स्वार्थापेक्षा मोठा शत्रू नाही आणि परोपकारासारखं पुण्य नाही.

   सुखाच्या क्षणी माणसांशिवाय शोभा नाही पण दुःखाशिवाय आपलं कोण? ते कळतंच नाही.

  भक्त्तीसारखी शांतता कशातच नाही आणि भगवंताएवढं बलवान कुणीच नाही.

  घरची माया वृद्धाश्रमात नाही आणि म्हातारपणी कुटूंबाशिवाय कुणीच नाही !!!


         आपली माणसं
           🌹🌹🌹🌹
close