एरंडोल :-स्वामी विवेकानंद अध्यात्मिक केंद्र एरंडोल यांनी आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
आजच्या या विशेष दिवशी,स्वामी विवेकानंद यांच्या १६२व्या जयंती आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या ४२७व्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये १९९ रक्तदात्यांनी आपले अमूल्य रक्तदान करून समाजासाठी प्रेरणादायी कार्य केले. हे कार्य समाजसेवेची खरी भावना प्रकट करणारे आहे.
रक्तसंकलनासाठी माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र, जळगाव यांचे विशेष सहकार्य लाभले. याशिवाय, प्रत्येक रक्तदात्यास भेट म्हणून "विवेक शलाका" दैनंदिनी प्रदान केली हे दैनंदिनीचे वाटप शहरातील दानशूर व्यक्तींच्या आर्थिक सहकार्याने शक्य झाले, यासाठी या दानशूरांचे मनःपूर्वक आभार.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे, रक्तदात्यांचे, देणगीदारांचे, तसेच रा.ती. काबरे विद्यालयाच्या संचालक मंडळ, शिक्षक, मुख्याध्यापक, पत्रकार आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिकांचे आभार मानले गेले.
तुमच्या अशा अथक प्रयत्नांमुळे समाजात सकारात्मकता पसरते आणि सेवाभाव वृद्धिंगत होतो. भविष्यातही असेच सहकार्य आणि पाठिंबा मिळावा, अशी मनापासून इच्छा आहे.
आपल्या या प्रेरणादायी कार्याला न्युज शिर्डी एक्सप्रेस कङुन हार्दिक धन्यवाद!