एरंडोल:- पोलीस स्टेशनकडून एरंडोल शहर, तालुका, तसेच सर्व व्यावसायिक व नागरिकांना कळवण्यात येते की, एरंडोल शहरातील दर रविवारी आठवडे बाजार मरीमाता मंदीर ते नथ्थु बापु दर्गा, नवीन आठवडे बाजार ओट्याजवळ, म्हसावद नाका ते अंजनी नदी पात्रात भरतो.मात्र मागील काही महिन्यांपासून, हा बाजार एरंडोल-नेरी राज्यमार्गावर धरणगाव चौफुली ते म्हसावद नाका दरम्यान भरत असल्याचे आढळले आहे.
समस्या...
- हा राज्यमार्ग मुख्य रहदारीचा असून येथे मोठ्या प्रमाणावर अवजड व लहान वाहने ये-जा करतात.
- राज्यमार्गावरील वाहतूक अडवणे किंवा वळवणे शक्य नाही.
बाजारातील गर्दीमुळे रोड अरुंद होत असून,गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सूचना व्यापारी व विक्रेत्यांसाठी...
1. धरणगाव चौफुली ते म्हसावद नाका राज्यमार्गावर कोणीही बाजारासाठी दुकान, लोटगाडी किंवा कोणताही व्यवसाय करू नये.
2. राज्यमार्गावर बाजार भरल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी.
पोलीस निरीक्षक
एरंडोल पोलीस स्टेशन