shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

कासोदा येथे प्रबोधनात्मक व्याख्यान –“बाप समजून घेताना”.


कासोदा:- येथे दिनांक १७ जानेवारी, शुक्रवार रोजी सकाळी वाजता कस्तुरबाई नंदाराम मंत्री माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडांगणावर श्री वसंत हंकारे यांचे समाज प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

कासोदा येथे प्रबोधनात्मक व्याख्यान – “बाप समजून घेताना”.

  

या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना तसेच पालकांना*“बाप समजून घेताना”*या विषयाची महत्त्वपूर्ण जाणीव करून देणे आहे. कासोदा ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ८वी ते १०वीतील विद्यार्थी, त्यांच्या पालकांसह शिक्षक वृंद सहभागी होणार आहेत.  

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कासोदा ग्रामस्थ,पोलीस स्टेशन, पत्रकार, व्यापारी असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, डॉक्टर असोसिएशन, ग्रामपंचायत यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले आहे. श्री हंकारे यांनी याआधीही या विषयावर व्याख्याने दिली असून त्यांना व्यापक प्रतिसाद मिळाला आहे.  

कार्यक्रमाची उद्दिष्टे...

1. तरुण पिढीला योग्य दिशा दाखवणे.  

2. श्रम करणाऱ्या आई-वडिलांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देणे.  

3. समाजप्रबोधन व समुपदेशनाच्या माध्यमातून सकारात्मक विचारांची रुजवण.  

आवाहन...

पंचक्रोशीतील सर्व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी, त्यांच्या पालकांनी या*“न भूतो न भविष्यती”*कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी उपस्थित राहणे अत्यंत गरजेचे आहे.  


close