प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी.
केज येथे युनिटी स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित प्रोफेशनल लीग क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉक्टर वासुदेव नेहरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी श्री विनोद गुंड क्रीडा संयोजक केज, श्री विकास उर्फ बंडू मस्के, श्री विजय आरकडे सर तसेच संयोजक श्री किरण सारुख, स्वप्निल चाटे व खेळाडू उपस्थित होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती यांनी जिवनात निरोगी उत्तम आरोग्यासाठी व्यायाम व खेळाडू असने या धावपळीच्या जीवनात खुप गरजेचे झाले आहे असे नमूद केले.व स्पर्धेतील संघांना खेळाडूंना जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या.