पळसदळ (ता. एरंडोल) येथील शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका,स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या आणि समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.महाविद्यालयाच्या परंपरेनुसार यंदाही महिला प्राध्यापिका पूजनाचा मान देण्यात आला.
या वर्षी हा मान महाविद्यालया तील महिला प्राध्यापक श्रद्धा शिवदे यांना मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री, सचिव रूपा शास्त्री, तसेच डॉ. पराग कुलकर्णी आणि प्राध्यापक जावेद शेख उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी तसेच स्त्रियांसाठी आत्मसन्मानाने जगण्याचा मार्ग मोकळा करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंगेश पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. दिग्विजय पाटील यांनी मानले.
प्रसंगी उपस्थित मान्यवर आणि शिक्षकवृंद:
**प्रा. सतीश ब्राह्मने**
**प्रा. सुमेश पाटील**
**प्रा. चंद्रभान पाटील**
**प्रा. श्रद्धा शिवदे**
**प्रा. मयुरी पाटील**
**प्रा. रोशनी पाटील**
**प्रा. मीना मोरे**
**विवेक पाटील**
**विंचुरकर सर**
**भावेश बडगुजर**
**नरेंद्र पवार**
याशिवाय शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाने सावित्रीबाई फुले यांची विचारधारा आणि त्यांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश साध्य केला.