श्रीरामपूर / प्रतिनिधी:
माणूस हा जसा कुटुंबवत्सल असतो तसाच तो समाजनिष्ठ असला पाहिजे यादृष्टीने चांगले कार्य, निर्मळ मन आणि सेवाभावाचा आदर्श म्हणजे माजी तहसिलदार गुलाबराव पादीर होय, असे गौरवोद्गार स्नेही परिवार ग्रुपचे उपाध्यक्ष प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी काढले.
श्रीरामपूर येथील शिरसगावस्थित इंदिरानगर येथील माजी तहसिलदार आणि श्रीसाई विमानतळाचे सर्व्हे अधिकारी गुलाबराव पादीर यांच्या कार्याचा गौरव विविध संस्था, ग्रुपतर्फे करण्यात आला, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. शिवाजीराव बारगळ बोलत होते.
अध्यक्षस्थानी ॲड, रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान कार्यकारिणी चेअरमन माजी प्राचार्य टी. ई. शेळके होते. वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी माजी तहसिलदार गुलाबराव पादीर यांच्या ७८ वर्षाच्या विविध समाजोपयोगी आणि शासन उपक्रमांतील प्रामाणिक कार्याचे कौतुक केले. कौटुंबिक, नोकरीविषयक आणि सामाजिक कार्याचा आदर्श सांगितला. यावेळी माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक,सचिव सुखदेव सुकळे, साहिल जाधवाणी. मीराबाई पादीर यांनी मनोगत व्यक्त केले. गुलाबराव पादीर म्हणाले, ज्यांच्यावर श्रीसाईबाबांची कृपा आणि आईवडिलांची पुण्याई बरोबर असते, त्याला जीवनात चांगलें कार्य करण्याची प्रेरणा मिळत राहते. असे सांगून त्यांनी काकडी विमानतळ उभारणीप्रसंगी आलेले अडथळे, जीवे मारण्याच्या धमक्या आणि चांगल्या लोकांचे सहकार्य यांचे अनुभव सांगितले.
२००५ नंतर सेवानिवृत्त झाल्यावर २००५ ते २०१७ च्या जिल्हा चौकशी समिती अधिकारी म्हणून केलेल्या कामाची माहिती देताना ते म्हणाले, काही लोक धर्मग्रथांच्या शपथा घेऊन खोटे कसे बोलतात ते किस्से सांगितले. बंधू कै.हिरालाल पादीर यांचे आदर्श जीवनात प्रेरणादायी ठरले असे सांगून ज्यांचे कुटुंब चांगले त्यांचे जीवनकार्यही चांगले होते असे उद्मार काढले.
प्राचार्य शेळके म्हणाले, गुलाबराव पादीर हे सेवेचे आणि मित्रपरिवारांचे आदर्श व्यक्तिमत्त्व असून त्यांचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा असे आवाहन केले. नीता पादीर, मुदुला जाधवाणी, ॲड् सागर पादीर, इंजिनिअर आकाश पादीर ,शशी पादीर यांनी उपक्रमाचे नियोजन करून शुभचिंतन व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर सौ. मीराताई पादीर यांनी आभार मानले.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111