shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

राजमाता जिजाऊ आदर्शमाता पुरस्कार : मा. आ. इद्रीसभाई नायकवाडी.


सांगली :- अनिल पवार.
  राजर्षी शाहू शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी आदर्श माताना राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्काराने सन्मानित केला जातो. जिजाऊनी सोळाव्या शतकात सोन्याचा नांगर घेऊन शेती कशी केली जाते हे शिकवले. जिजाऊंनी छत्रपतींना नैतिकतेचे धडे दिले तर प्रत्येक माऊलीने आईने छत्रपती शिवाजी नाही तर त्या वाटेने चालणारे सुसंस्कृत सुपुत्र तयार केले या भूमिकेतून चालणारी राजर्षी शाहू शिक्षण संस्था दरवर्षी  बारा मातांना राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्काराने सन्मानित करते.यावर्षीचा राजर्षी शाहू शिक्षण संस्था इनाम धामणी संचलित राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक तालुका मिरज जिल्हा सांगली येथे 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न झाला. 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ह. भ. प. गुरु बाबा औसेकर नाथ संस्थान मठाधिपती औसा जिल्हा लातूर, उपस्थित होते. औसेकर महाराजांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये  सांगितले की वडील म्हणजे स्वर्गाचे दार पण खरा स्वर्ग हा आईच्या पायाखालीच असतो इतके श्रेष्ठत्व आईचे असते असे  म्हणाले.,.,मा. आ इद्रिसभाई नायकवडी  यांनी आपल्या मनोगतात असे सांगितले की ज्या वेळेला एखादी स्त्री बाळाला जन्म देते. त्याचवेळी तिला खर्या अर्थाने पुरस्कार प्राप्त झालेला असतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सतीश बाबा देशमुख चेअरमन सहकारी मजूर संस्था फेडरेशन सांगली.   भाषणामध्ये  सांगितले की अशा पद्धतीने आईचा आपल्या सन्मान करावा हे आमच्या कधी लक्षात आले नाही. आम्ही भरपूर व्यासपीठ गाजवले पण, त्या व्यासपीठावर आईचाही सन्मान झाला पाहिजे हे मात्र आज कळाले. माननीय आनंदा बापू पवार जिल्हाध्यक्ष शिवसेना सांगली, श्री महावीर पाटील इनाम धामणी, श्री राजेंद्र पाटील इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे संचालक मा  गगनराज पाटील भैय्या यांनी केले. मा.विठ्ठल पाटील काकाजी अध्यक्ष राजर्षी शाहू शिक्षण संस्था इनामधामणी यांनी प्रास्ताविक केले. सौ राजेश्वरी गगनराज पाटील वहिनीसाहेब यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली
  *पुरस्कारार्थी खालील प्रमाणे...*
1)श्रीमती उर्मिला उदयसिंह देशमुख, कोकरूड,ता. शिराळा...
२) सौ. विमल वसंतराव तारळेकर,विटा ता. खानापूर...
३) सौ. शिल्पा शिवाजी पाटील, अंकलखोप, ता. पलूस...
४) श्रीमती कुसुम महादेव पवार, कवठेमंकाळ...
५) श्रीमती कविता अंबाजी माळी, नरवाड, मिरज...
६) सौ. सुमन रामचंद्र पवार, इस्लामपूर 
७) श्रीमती पारूबाई बाबा नांगरे, आटपाडी.
८) सौ.रंजना सूर्यकांत गौंड मिरज.
९) सौ. रंजना शेटीबा घाडगे,कडेपुर, कडेगांव,
१०) श्रीमती तीताबाई रामचंद्र चव्हाण,जत.
११) सौ. सुनीता आदिनाथ उपाध्याय, सांगली.
१२) सौ. अरुणाताई बालाजी पाटील, तासगाव.*राजमाता जिजाऊ आदर्शमाता पुरस्कार : मा. आ. इद्रीसभाई नायकवाडी.*

*सांगली :- अनिल पवार.*

   राजर्षी शाहू शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी आदर्श माताना राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्काराने सन्मानित केला जातो. जिजाऊनी सोळाव्या शतकात सोन्याचा नांगर घेऊन शेती कशी केली जाते हे शिकवले. जिजाऊंनी छत्रपतींना नैतिकतेचे धडे दिले तर प्रत्येक माऊलीने आईने छत्रपती शिवाजी नाही तर त्या वाटेने चालणारे सुसंस्कृत सुपुत्र तयार केले या भूमिकेतून चालणारी राजर्षी शाहू शिक्षण संस्था दरवर्षी  बारा मातांना राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्काराने सन्मानित करते.यावर्षीचा राजर्षी शाहू शिक्षण संस्था इनाम धामणी संचलित राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक तालुका मिरज जिल्हा सांगली येथे 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ह. भ. प. गुरु बाबा औसेकर नाथ संस्थान मठाधिपती औसा जिल्हा लातूर, उपस्थित होते. औसेकर महाराजांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये  सांगितले की वडील म्हणजे स्वर्गाचे दार पण खरा स्वर्ग हा आईच्या पायाखालीच असतो इतके श्रेष्ठत्व आईचे असते असे  म्हणाले.,.,मा. आ इद्रिसभाई नायकवडी  यांनी आपल्या मनोगतात असे सांगितले की ज्या वेळेला एखादी स्त्री बाळाला जन्म देते. त्याचवेळी तिला खर्या अर्थाने पुरस्कार प्राप्त झालेला असतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सतीश बाबा देशमुख चेअरमन सहकारी मजूर संस्था फेडरेशन सांगली.   भाषणामध्ये  सांगितले की अशा पद्धतीने आईचा आपल्या सन्मान करावा हे आमच्या कधी लक्षात आले नाही. आम्ही भरपूर व्यासपीठ गाजवले पण, त्या व्यासपीठावर आईचाही सन्मान झाला पाहिजे हे मात्र आज कळाले. माननीय आनंदा बापू पवार जिल्हाध्यक्ष शिवसेना सांगली, श्री महावीर पाटील इनाम धामणी, श्री राजेंद्र पाटील इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे संचालक मा  गगनराज पाटील भैय्या यांनी केले. मा.विठ्ठल पाटील काकाजी अध्यक्ष राजर्षी शाहू शिक्षण संस्था इनामधामणी यांनी प्रास्ताविक केले. सौ राजेश्वरी गगनराज पाटील वहिनीसाहेब यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली
  *पुरस्कारार्थी खालील प्रमाणे...*
1)श्रीमती उर्मिला उदयसिंह देशमुख, कोकरूड,ता. शिराळा...
२) सौ. विमल वसंतराव तारळेकर,विटा ता. खानापूर...
३) सौ. शिल्पा शिवाजी पाटील, अंकलखोप, ता. पलूस...
४) श्रीमती कुसुम महादेव पवार, कवठेमंकाळ...
५) श्रीमती कविता अंबाजी माळी, नरवाड, मिरज...
६) सौ. सुमन रामचंद्र पवार, इस्लामपूर 
७) श्रीमती पारूबाई बाबा नांगरे, आटपाडी.
८) सौ.रंजना सूर्यकांत गौंड मिरज.
९) सौ. रंजना शेटीबा घाडगे,कडेपुर, कडेगांव,
१०) श्रीमती तीताबाई रामचंद्र चव्हाण,जत.
११) सौ. सुनीता आदिनाथ उपाध्याय, सांगली.
१२) सौ. अरुणाताई बालाजी पाटील, तासगाव.
close