एरंडोल:- अंजनी ग्रुप दुय्यम विद्या मंदिर, हिगोणे (ता. धरणगाव) येथे एक ऐतिहासिक कार्यक्रमाच्या साक्षीदार होण्याची संधी मिळाली. या उपक्रमांतर्गत,सन 1964 ते 2024 या कालावधीत इयत्ता 10 वीच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या विशेष प्रसंगी शाळेला संगणक भेट दिल्याबद्दल, शाळेचे अध्यक्ष,मुख्याध्यापक आणि माजी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत श्री. सचिन दुर्गादास महाजन,एरंडोल यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देणारा, त्यांच्या योगदानाला सलाम करणारा आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.