shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

ओम शांती सेंटर एरंडोल येथे आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते स्वच्छता गृह व वॉशिंग स्पॉटचे उद्घाटन.

खासदार स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न...

एरंडोल :-दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी एरंडोल येथील ओम शांती सेंटरमध्ये पुरुष व महिलांसाठी स्वच्छता गृह व वॉशिंग स्पॉटच्या उद्घाटनाचा सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमास तालुक्याचे आमदार माननीय अमोल दादा पाटील आणि खासदार श्रीमती स्मिताताई वाघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 


खासदार स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न...
 खासदार स्मिताताई वाघ यांच्या                 उपस्थितीत सोहळा संपन्न... 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वासुदेव पाटील होते. यावेळी प्राध्यापक मनोज पाटील,शालिक भाऊ गायकवाड, रमेश महाजन, रवी महाजन, राजेंद्र चौधरी, कृणाल महाजन, मयूर महाजन, अशोक चौधरी, जगु ठाकूर, अमोल पाटील, चिंतामण पाटील, पुंडलिक पवार, राजेंद्र महाजन, श्रीकांत भाई, दिलीप बापू पाटील यांसह शिवसेना व भाजपा पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.  

हा कार्यक्रम ब्रह्मा बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आला होता. बी.के. पुष्पा दीदी व बी.के. छाया दीदी यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कार केला.  

यावेळी आमदार अमोल दादा पाटील यांनी मतदार संघाच्या विकासासाठी आपण वचनबद्ध असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, "एरंडोलकरांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. जास्तीत जास्त निधी मिळवून मतदार संघाच्या विकासासाठी काम करणे हे माझे कर्तव्य आहे. ओम शांती सेंटर हे मनःशांती व ध्यानासाठी एक उत्तम स्थळ आहे. येथे लोकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे."खासदार स्मिताताई वाघ यांनीही त्यांच्या मनोगतात मतदार संघाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. त्या म्हणाल्या, "केंद्राकडून जास्तीत जास्त निधी आणून मतदार संघाचा विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंगळे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनोज ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ओम शांती सेंटरमधील सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. उपस्थितांसाठी फलाहार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी आमदार अमोल पाटील यांनी ओम शांती केंद्रासाठी सभागृह व अप्रोच रोड उपलब्ध करून दिल्याची घोषणा केली, तर खासदार स्मिताताई वाघ यांनी गार्डनसाठी बोरवेल व पेव्हर ब्लॉक बसवण्याचे आश्वासन दिले.

 


close