मोर्शी:-
मा. वैद्यकीय अधिक्षक डॉ. श्री. प्रमोद पोतदार याचें मार्गदर्शनाखाली, आगार व्यवस्थापक श्रीमती आशाताई वासनिक तसेच बसस्थानक प्रमुख श्री. राजेश तांबेकर याचें सहकार्याने आज दि. 16.1.25 ला एसटी डेपो मोर्शी येथील अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी व रक्त तपासणी करण्यात आली.
यामध्ये राष्ट्रीय असंसर्गजन्य कार्यक्रम, एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र तसेच एचएलएल याचें द्वारे सेवा देण्यात आल्या. रूग्णालयीन कर्मचारी श्री. विनय शेलुरे, श्रीकांत गोहाड, शेख युसूफ, श्रीमती. ऋषाली भगत, सुवर्णा श्रीराव, कविता इंगोले यांचे योगदान लाभले. शिबिराला एसटी कर्मचारी व अधिकाऱी यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.