shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

चर्मकार समाजच्या राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे दि.५ रोजी आयोजन

समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन;
राज्यातील चर्मकार समाज एकवटणार

नगर / प्रतिनिधी:
चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने नगर शहरात राज्यस्तरीय चर्मकार समाजाचे वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार ५ जानेवारी रोजी येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत हा मेळावा होणार असून, या मेळाव्यात सर्व समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे, वधू-वर मंडळाध्यक्ष अश्रूजी लोकरे, केंद्रप्रमुख बापूसाहेब देवरे यांनी केले आहे.
या मेळाव्यासाठी आमदार संग्राम जगताप, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार हेमंत ओगले, माजी आ.भाऊसाहेब कांबळे, माजी आ. लहूजी कानडे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, कॉ. स्मिताताई पानसरे, संपतराव बारस्कर, माजी नगरसेवक आशोक कानडे, नगरसेवक सागर बोरुडे, उद्योजक अंकुशराव कानडे, नितीन उदमले, नगरसेवक सुनील त्र्यंबके, तुकाराम शेंडे, डॉ. रावसाहेब बोरुडे, अजित रोकडे, आर्किटेक्चर कल्याण सोनवणे, विश्‍वनाथ निर्वाण, भास्करराव जाधव, उद्योजक रामदास उदमले आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

चर्मकार संघर्ष समितीच्या माध्यमातून सातत्याने समाजकार्य सुरु आहे. दरवर्षी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करुन समाजातील मुला-मुलींचे विवाह जमविण्याचे काम केले जात आहे. तर या कार्यक्रमानिमित्त राज्यातील चर्मकार समाज बांधव एकत्र येत आहे. चर्मकार समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात सातत्याने संघटनेच्या माध्यमातून आवाज उठविण्यात आला आहे. तर समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या विचाराने व महापुरुषांच्या समतेच्या मुल्यांवर संघटना कार्यरत आहे. समाजातील गुणवंताचा सन्मान, चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळातील विविध प्रश्‍न सोडविणे व महिलांच्या विविध प्रश्‍न सोडविण्याचे कार्य सुरु असल्याचे शिवाजीराव साळवे यांनी म्हंटले आहे.

वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
close