shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

हेल्मेट युक्त श्रीरामपूर,अपघात मुक्त श्रीरामपूर मोहिमेस प्रारंभ

वाहतूक नियम जनजागृतीपर हेल्मेट दुचाकी रॅली संपन्न

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
रस्ते सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत दि. ७ जानेवारी २०२५ रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांचे तर्फे वाहतूक नियमांची जनजागृतीसाठी हेल्मेट दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रेतील सात तालुक्यांमध्ये सन २०२४ मध्ये एकूण ३४५ जणांनी अपघातामध्ये आपले प्राण गमावावे लागले आहे, त्यामध्ये दुचाकीस्वारांची संख्या जवळपास  ७० टक्के म्हणजेच २४२ इतकी होती. म्हणून दुचाकी चालवताना हेल्मेट वापरांचा नागरिकांमध्ये प्रसार करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांचे तर्फे आरटीओ कार्यालयातून दुचाकी रॅली काढण्यात आली.सदर रॅलीस श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात झाली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.रविद्र कुटे उपस्थित होते.
सदर रॅलीमध्ये मोठ्या संख्येने दुचाकी स्वाराने सहभाग नोंदविला. 
सदरील रॅलीची उप प्रादेशिक परिवहन कार्यालयापासून सुरुवात होवून संगमनेर रोड, महात्मा गांधी चौक, गिरमे चौक, छत्रपती शिवाजी महाराज रोड, दशमेश नगर चौक, कर्मवीर भाऊराव पुतळा, नवीन प्रशासकीय इमारत अशा मार्गाने शिरसगाव मार्गे उपदेशक परिवहन कार्यालयाच्या प्रांगणात रॅलीचा समारोप करण्यात आला. 

या रॅलीच्या निमित्ताने श्रीरामपूरकरांमध्ये दुचाकी चालवताना कायम हेल्मेटचा वापर करण्याची सवय कायमस्वरूपी लावून घ्यावी असा संदेश देण्यात आला, सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिवहन कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक प्रवीण सर्जेराव, विशाल मोरे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक रोहित पवार, धीरज भामरे, कुणाल वाघ, अतुल गावडे, रोशन कुमार चव्हाण, पांडुरंग सांगळे, हेमंत निकुंभ, शितल तळपे, रोशनी डांगे, परेश नावरकर, गोकुळ सूळ, संतोष मुंडे, दर्शन सोनवणे, संजय जाधव आणी मयूर मोटार ड्रायव्हिंग स्कूल चे प्रताप शिंदे इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.
वृत्त विशेष सहयोग
पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर 
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111
close