shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्री साईबाबांजीची पावन भूमि असलेल्या शिर्डीत भव्य पुरस्कार सोहळा - सुदाम संसारे

वजीर शेख/ पाथर्डी
ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित. राष्ट्रीय पातळीवरील साई कला गुणगौरव समाजभूषण पुरस्कार -२०२५ सोहळा शुक्रवार दि. १० जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता. शिर्डीतील हाॅटेल शांती कमल (नगर - मनमाड रोड, ५०० रुम - भक्त निवास शेजारी) या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

सदरील पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्र राज्यातील पहिलाच राष्ट्रीय पातळीवरील,मान - सन्मानाचा आणी प्रतिष्ठेचा असा असल्याने या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार निलेश लंके,आणि उत्तर शिर्डी लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाघचौरे यासोबतच बाॅलिवुड चित्रपटातील अभिनेत्री चित्रा दिक्षित यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून किशोर कालडा -संगमनेर,उत्तम काका घोगरे पाटील - लोणी, संजय मोरे अ‍ॅन्टी करपशन चिफ महाराष्ट्र,माजी आमदार अमोल जावळे,चंद्रकांत निंबा पाटील.ज्योती जाॅर्जे /गवळी,वंदना गव्हाणे, डाॅ.अजय वारुळे,राजेश काळे आणी सुदाम संसारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्यास संस्थापक अध्यक्ष सुदाम संसारे, उपाध्यक्षा वंदना गव्हाणे,डाॅ.अजय वारुळे, कार्याध्यक्ष राजेश काळे, सचिव संभाजीराव खैरे, संयोजक अर्चना परदेशी, सरचिटणीस समाधान बिथरे तसेच सदस्य मोहिनी आहेर, दर्शना रायजादे, प्रमिला डोंगरे, श्रीमेसवाल मॅडम, मनिषा घाडगे मॅडम, प्रिया डाखोडे, मेघा शिंपी,विद्या ठाकुर,प्रतिभा प्रमोद,शितल राऊत,कांचन शिरभे, राजनंदीनी आहिरे, प्रसिद्धी प्रमुख पांडुरंग गोरे,वजीर शेख, दिपक गरुड, दतात्रय आठरे,दिलीप वनवे,सारंग महाजन,किरणताई वाघ,प्रा. डाॅ.सुरेशकुमार गुडधे, शिवाजी डोंगरे,ज्योत्स्ना मॅडम, सुवर्णा डहाट तसेच सर्व सदस्य आदी पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे अध्यक्ष सुदाम संसारे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सदरील पुरस्कार सोहळा शुक्रवार दि.१० जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता वेळेवरच  सुरु होणार असल्याने सर्व पुरस्काराथीॅ यांनी सकाळी दहा वाजण्या आधी कार्यक्रम स्थळी उपस्थित रहावे असे अवाहानही आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
close