तसेच सदरील काम जून 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे परंतु सदरील काम अत्यंत संथ गतीने चालू आहे तरी काम लवकरात लवकर होणे अत्यंत गरजेचे आहे. सदरील रस्त्यावरून होणारी एसटी वाहतूक बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे त्यांना शाळेमध्ये जाण्या येण्यासाठी इतर कसलीही सोय नाही. निष्कृष्ट व दर्जाहीन कामामुळे दोन चाकी वाहने ही वाहनधारक या रस्त्याने चालवू शकत नाहीत परिणामी वाहतुकीचा अडथळा होत आहे.
तहसीलदार साहेब ,आमदार साहेब ,कार्यकारी अभियंता ,उपकार्यकारी अभियंता व पोलीस स्टेशन यांनी संबंधित एजन्सीला नोटीस इशूव्ह करून श्री मते इंजिनियर यांची नियुक्ती तात्काळ रद्द करावी नसता पिसेगाव ग्रामस्थांच्या वतीने 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता पिसेगाव फाटा एन एच ५४५ डी वर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा पिसेगाव ग्रामस्थांनी तहसीलदार केजी यांना दिला आहे. सदरील निवेदनावर महादेव सुर्यवंशी,डॉक्टर वासुदेव नेहरकर, भास्कर सूर्यवंशी ,अनिल सूर्यवंशी ,अशोक नेहरकर, रामदास लांडगे, जयवंत टोपे, लांडगे बाळासाहेब ,मुंडे महादेव ,संग्राम लांडगे ,तेजस लांडगे व पिसेगाव येथील ग्रामस्थांनी तहसीलदार केज यांना इशारा दिला आहे.