एरंडोल :-येथे सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून पुणे येथील सावित्री शक्तीपीठ या संस्थेच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची दखल घेत त्यांना सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरविण्यात आले. यात प्रामुख्याने एरंडोलच्या माजी उपनगराध्यक्ष आरती महाजन, चोपड्याच्या माजी उपनगराध्यक्ष सुरेखा माळी, भडगाव येथील निवृत्त मुख्याध्यापिका लतिका वाघ, पाचोरा येथील ऍड.भाग्यश्री महाजन, धरणगावच्या ललिता वाघ या पुरस्कारार्थी महिलांचा समावेश आहे. सन्मानपत्र व सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याची प्रतिकृती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. तसेच माळी समाजाच्या महिलांच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाची स्थापना करण्यात आली. यावेळी पुरस्कारार्थी महिलांनी तसेच उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची सखोल माहिती दिली. आज विविध क्षेत्रात महिलांच्या होत असलेल्या प्रगतीचे खरे श्रेय सावित्रीबाईंना असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. सावित्रीबाईंनी त्याकाळी संघर्ष केला नसता तर आज देखील स्त्रियांचे जीवन अंध:कारमय राहिले असते. आधुनिक भारताच्या प्रगतीत पुरुषांच्या बरोबरीने सावित्रीच्या लेकी खांद्याला खांदा लावून काम करीत असल्याचा अभिमान वाटतो असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्षा तथा माजी नगराध्यक्षा सौ जयश्री पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे व्यासपीठावर सर्व महिला पदाधिकाऱ्यांना विराजमान करून शहरातील पुरुष मान्यवरांनी श्रोतेगणात बसून स्त्री शक्तीचा सन्मान केला.
माजी नगराध्यक्षा शोभा महाजन व शकुंतला अहिरराव यांनी मनोगत व्यक्त केले. सावित्री शक्तीपीठ संस्थेचे सदस्य निवृत्त तहसीलदार अरुण माळी व प्रकल्प प्रमुख एस बी महाजन यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण महाजन यांनी केले तर प्रास्ताविक युवासेनेचे जिल्हा समन्वयक अतुल महाजन यांनी केले. आभार माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन यांनी मानले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, माजी नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी, समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन, माजी जि प सदस्य नानाभाऊ महाजन, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन, माजी नगराध्यक्षा भारती महाजन, कृ उ बा चे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन, य च शि प्र मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील, वि का स संस्थेचे माजी चेअरमन दुर्गादास महाजन, माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी, माजी उपनगराध्यक्ष डॉ सुरेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष जगदीश ठाकुर, माजी उपनगराध्यक्ष संजय महाजन, माजी नगरसेविका कल्पना महाजन, माजी नगरसेविका हर्षाली महाजन, माजी नगरसेविका वर्षा शिंदे, माजी नगरसेविका प्रतिभा पाटील, माजी नगरसेवक योगेश महाजन, माजी नगरसेवक रमेश माळी, सामाजिक कार्यकर्ते आनंदा चौधरी, पी जी चौधरी, इच्छाराम माळी, राजेंद्र शिंदे, राजेंद्र महाजन, प्रमोद महाजन राजेंद्र ठाकूर, ईश्वर बिऱ्हाडे, शांताराम महाजन, रमेश माळी, अनिल महाजन, गोपाल महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमा यशस्वीतेसाठी कमलेश महाजन, समाधान महाजन, सचिन माळी, गोपाल महाजन, सचिन महाजन, सुदर्शन महाजन, युवराज महाजन, प्रल्हाद महाजन, प्रवीण महाजन, हिम्मत महाजन, गजानन महाजन, राजधर महाजन, जितेंद्र महाजन, मयूर महाजन, कुणाल पाटील, दर्शील महाजन यांनी परिश्रम घेतले.