shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

राहुरीच्या विद्या मंदिर प्रशाला सहल अपघाताची शिक्षणाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश.

आप्पासाहेब ढूस यांच्या मागणीला यश. 

राहुरी - दि. २४ जानेवारी 
राहुरी येथील विद्यामंदिर प्रशालेच्या सहलीला अपघात होऊन कित्येक विद्यार्थी जखमी झाले होते. त्याबाबत प्रशालेने विद्यार्थ्यांना मदत दिली नाही तसेच सहलीत असलेल्या त्रुटी व त्यास असलेले जबाबदार शिक्षक, संस्था चालक व शिक्षण अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रहार चे आप्पासाहेब ढूस यांनी शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे यांना दिलेल्या तक्रारीवरून अहमदनगरचे शिक्षणाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 


     आप्पासाहेब ढूस यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाची सहलीसाठी परवानगी घेतली नसल्याने सहलीसाठी आवश्यकता सुरक्षा बाळगण्यात न आल्याने हा अपघात झाला आहे व त्यामुळे कित्येक विद्यार्थी मरता मरता वाचलेले आहेत तर कित्येक विद्यार्थी जायबंदी झाली आहेत.  त्यामुळे या अपघाताला जबाबदार असणाऱ्या सहलीच्या गाडीच्या ड्रायव्हर पासून ते सहलीचे आयोजन करणारे शिक्षक मुख्याध्यापक संस्थाचालक यांचे पासून ते थेट राहुरीच्या गटशिक्षणाधिकारी यांचे पर्यंत सर्वांची सखोल चौकशी व्हावी व दोशींवर कडक कारवाई करावी जेणेकरून अशा पद्धतीने मोठा पैसा उभा करण्यासाठी अनधिकृत सहलींना राज्यांमध्ये पायबंद बसेल. त्यासाठी निवेदनात ढूस यांनी अनेक मुद्दे मांडले असून त्या मुद्यात चौकशी करण्यात यावी, यासाठी अप्पासाहेब ढूस यांनी राज्याचे शिक्षण मंत्री तसेच अहमदनगरचे शिक्षणाधिकारी यांना तक्रार दिली होती.  त्यानुसार अहमदनगरचे शिक्षणाधिकारी यांनी राहुरीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना या घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 
     या चौकशीमुळे जिल्ह्यामधील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून येथून पुढे अवैध सहलीचा बाजार बंद होण्यास या तक्रारीमुळे मदत होणार असून सहलीच्या अपघाताच्या प्रमाणाला त्यामुळे आळा बसणार आहे, असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ढूस यांनी सांगितले.
close