श्रीरामपूर / प्रतिनिधी:
शिक्षणतपस्वी,देशभक्त, समाजसेवक,साहित्यिक असलेले स्व.ॲड्.रावसाहेब शिंदे यांच्या महादेव मळ्यातील विद्यानिकेतन प्री प्रायमरी स्कूल म्हणजे जणू ज्ञानतपस्वी रवींद्रनाथ टागोरांचे संस्कार आणि शिक्षण देणारे शांतीनिकेतनच होय,असे मत साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील महादेव मळ्यातील ॲड्. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचालित विद्यानिकेतन प्री प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थी विविध क्रीडास्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून प्रतिष्ठानचे कार्यकारिणी चेअरमन माजी प्राचार्य टी. ई. शेळके होते. प्राचार्या चित्रा सूरडकर यांनी स्वागत केले तर समन्वयक जया फरगडे यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सांगितले की, बालपण हे ओल्या मातीसारखे असते, बालपणातच संस्कार,ज्ञान, क्रीडा, देशभक्ती आणि समाजनीतीचे बाळकडू त्याला मिळाले पाहिजेत, यादृष्टीने विद्यानिकेतन शाळेतील उपक्रम आणि परिसरसमृद्धी यांचा प्रभावी वापर केला जातो, हे कौतुकास्पद आहे, श्रीमती शशिकलाताई शिंदे, डॉ. राजीव शिंदे, डॉ. प्रेरणा शिंदे, चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके, प्राचार्या चित्रा सूरडकर आणि सर्व शिक्षक यांचे नियोजन उपयुक्त आहे, त्यामुळेच ही शाळा जणू शांतीनिकेतन सारखी ज्ञानसंस्कारी शाळा असल्याचे डॉ. उपाध्ये यांनी सांगितले.
प्राचार्य शेळके म्हणाले, बालपण हे संवेदनशील आणि काहीसे निराधार असते, त्यासाठी शाळेतील शिक्षक फार महत्वाचे असतात. असे सांगून त्यांनी प्राचार्य डॉ. गागरे व डॉ. उपाध्ये यांनी कोणत्या प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले, ते प्रसंग सांगून आता मुलांना खूप सोयी सवलती आहेत, त्यांचा फायदा त्यांना होत आहे, त्याविषयी कौतुक केले.अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांनी चंद्रावर जाऊ चला ही कविता सादर करून क्रीडा उपक्रमाचे कौतुक केले.
टीचर प्रिती राठी, सोनाली बनभेरू, प्रियंका पगारे यांनी विविध वर्ग ग्रुपचे बक्षीस वितरण सूचना मांडली. टीचर निकिता गरुड, मनिषा आव्हाड, कल्याणी जोशी, साक्षी गायकवाड, प्रिया दळवी, शुभांगी दुशिंग, अश्लेषा दुशिंग, साक्षी दुशिंग, कोमल बत्तीसे, यांनी उपक्रमांचे नियोजन केले. हर्षदा भांड यांनी छायाचित्रण केले. सूत्रसंचालन जया फरगडे यांनी केले तर प्राचार्या चित्रा सूरडकर यांनी आभार मानले.
*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111