shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

ओलंपियन बॉक्सर अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू मनोज पिंगळे यांची सदिच्छा भेट.


इंदापूर : पळसदेव (ता. इंदापूर)येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी ऑलिंपिक खेळाडू पुरस्कार विजेते मनोज पिंगळे यांनी सदिच्छा भेट दिली व आपल्या मनोगतातून त्यांनी विद्यार्थी व खेळाडूंना खेळाविषयी माहिती दिली .


यावेळी पुणे शहर बॉक्सिंग संघटना सचिव अजित ओसवाल, कार्याध्यक्ष विकास काटे ,सदस्य केदार कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष  हनुमंत (नाना) बनसुडे, सचिव नितीन बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे, समन्वयक सुवर्णा वाघमोडे,विभाग प्रमुख प्रवीण मदने, तेजस्विनी तनपुरे, ज्योती मारकड,सीमा बाराते, क्रीडा शिक्षक रुपेश भालेराव सतीश बनसुडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
close