एरंडोल:-एरंडोल मतदारसंघात विक्रमी मताधिक्याने विजयी झालेल्या नवनिर्वाचित आमदार अमोल चिमणराव पाटील यांचा सत्कार येथील महानुभाव पंथीय श्रीकृष्ण मंदिर विश्वस्तांच्या वतीने आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात आमदार पाटील यांच्या हस्ते श्रीकृष्ण मूर्तीस पुष्पहार अर्पण व विडा समर्पणाने झाली. श्रीकृष्ण मंदिराच्या व्यवस्थापक तपस्विनी शैलाताई पंजाबी व प्राचीताई बिडकर यांनी आमदारांना श्रीफळ देऊन शुभाशीर्वाद दिले.यानंतर विश्वस्त मंडळ व उपदेशी बांधवांच्या वतीने आमदारांचा भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. प्रेमराज पळशीकर यांनी भूषवले.
आमदार अमोल पाटील यांचे मनोगत...
या प्रसंगी आमदार पाटील यांनी आपल्या भाषणात माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या योगदानाचा उल्लेख करत रामचंद्र नगर परिसरातील नागरी सुविधांच्या विकासाचे उदाहरण दिले. त्यांनी मतदारसंघातील नागरिकांचे आभार मानत, श्रीकृष्ण मंदिरासाठी निवडणुकीपूर्वी दिलेल्या ५० लाख रुपयांच्या निधीची आठवण करून दिली.
त्यांनी असेही सांगितले की, "जनतेने दिलेला विश्वास माझ्या जबाबदारीत भर घालतो. आगामी काळात मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणार असून द्वेषाचे राजकारण न करता विकासाच्या मार्गावर भर देईन." महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या तत्वज्ञानाचा उल्लेख करत त्यांनी मठ-मंदिरांच्या कार्याला सहकार्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमातील प्रमुख उपस्थिती...
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील, तालुकाप्रमुख रवींद्र जाधव, माजी उपनगराध्यक्ष जगदीश ठाकुर, माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन, शहर संघटक मयूर महाजन, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल आंधळे, पुंडलिक पवार, युवासेनेचे शहरप्रमुख कृष्णा ओतारी, गुड्डू जोहरी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगदान...
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव भिका देवरे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रभाकर सोनार, प्रमोद पाटील, किशोर महाजन, ईश्वर पाटील, रवींद्र पाटील, विजय सोनार, मनोज चौधरी, एस आर पाटील, किशोर शेलार, सुधाकर हिरपुडे, राजू बिर्ला, अशोक चौधरी, अशोक जावळे, अनिल महाजन, शिवाजी मराठे, संतोष वंजारी, डॉ कृष्णराज पळशीकर, डॉ योगीराज पळशीकर, गोपाल सोनार, जयेश सोनार, दिनेश पाटील, हर्षल सोनार, उमेश चौधरी, भटू सोनार, प्रशांत पाटील, मयूर महाजन, हर्षल महाजन, दर्शिल महाजन आदींनी परिश्रम घेतले.