*तपास पुर्ण करून तिन महिन्यात अहवाल सादर करण्याचे राहुरी येथील मा. न्यायालयाचे आदेश.!
राहुरी - दि २४/०१/२५
देवळाली प्रवरा येथील आप्पासाहेब ढूस यांचे घरावरील हल्ला प्रकरणी तपास पुर्ण करून तिन महिन्यात अहवाल सादर करण्याचे राहुरी येथिल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मा. आदित्य शिंदे साहेब यांचे मे. कोर्टाने आदेश दिले असून घटनेटील *आका* आणि *आकाचा आका* उजेडात येईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असे आप्पासाहेब ढूस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले व मे न्यायालयाचे आभार व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांच्या देवळाली प्रवरा येथील निवासस्थानी घराच्या प्रांगणात दि.२२/१०/२०२३ रोजी पहाटे ०१.४२ वा. विध्वंसक विस्पोटके फोडून घराच्या अंगणातील चारा वैरण पेटवून देण्याचा व ढूस यांच्या कुटुंबाला जाळून मारण्याचा आणि दहशत पसरविण्याचा आरोपींनी प्रयत्न केला होता. तेंव्हा आप्पासाहेब ढूस यांनी घटनेतील स्पोटकांच्या प्रकाशात सदर आरोपी पैकी एका आरोपीस ओळखले होते. देवळाली प्रवरा येथीलच सुधीर विठ्ठल टिक्कल असे त्या आरोपीचे नाव असुन त्याचे सोबत असलेले इतर चार आरोपी कोण आहेत याबाबत तपास करणे करिता व त्यांचा शोध घेण्यासाठी आप्पासाहेब ढूस यांनी राहुरी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केला.. परंतु आरोपींच्या राजकिय दबावामुळे ढूस यांच्या फिर्यादीची पोलीसांनी दखल घेतली नाही. तसेच, घटनेचा तपासही केला नाही. तसेच फिर्यदिने पोलीस स्टेशन मध्ये संबंधित तपासी अधिकारी यांच्याकडे वारंवार विनंत्याही केल्या. मी सांगतो तशी फिर्याद घेवून तापास करण्यात यावा अशी विनंती ढूस यांनी करूनही पोलीसांनी दखल घेतली नाही. त्यामुळे फिर्यादी आप्पासाहेब ढूस यांना राहुरी येथील मे. न्यायालयात धाव घ्यावी लागली.
फिर्यादीचे वतीने ऍड वर्षा गागरे यांनी राहुरी न्यायालयात फिर्यात दाखल केली. ऍड वर्षा गागरे यांनी मा. कोर्टात फिर्यदीची बाजू मांडताना.. फिर्यादीच्या फिर्यादीची दखल घेतली नाही. तसेच, साक्षी पुरावे नोंदवून वीस्पोट घडवून आणणाऱ्या आरोपींपैकी एका आरोपीस फिर्यादिने ओळखले. त्याचप्रमाणे इतरही साक्षी पुरावे मध्ये आरोपीस ओळखलेचे निष्पन्न झाले असल्याचे ऍड वर्षा गागरे यांनी मा. कोर्टापुढे युक्तिवाद केला.. सर्व साक्षी पुराव्याचे अवलोकन केल्यास आरोपींनी प्रस्तुतचा गुन्हा केला असल्याचे प्रथमदर्शनी फिर्यादीने सिद्ध केले असल्याने राहुरी येथिल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मा. आदित्य शिंदे साहेब यांचे मे. कोर्टाने राहुरीचे पोलीस अधिकारी यांना आरोपींविरोधात सी आर पी सी १९७४ च्या कलम २०२ नुसार तपास पुर्ण करून तिन महिन्यात अहवाल सादर करण्याचा आदेश पारित केला आहे.
राहुरी येथील मे न्यायालयात आप्पासाहेब ढूस यांचे वतीने विधिज्ञ ऍड वर्षा गागरे यांनी भक्कम बाजू मांडल्याने राहूरी पोलिसांनी राजकीय दबावाखाली दाबलेल्या या प्रकरणाला आज खऱ्या अर्थानं वाचा फुटली असुन ढूस यांच्या कुटुंबाला न्याय मिळणार आहे.
ढूस यांच्या घरासमोरील सीसी टीव्ही फुटेज मध्ये आरोपी व त्यांनी केलेली जाळपोळ स्पष्ट दिसत असतानाही राहुरीच्या पोलिसांकडून राजकिय दबावामूळे खोटा साक्षीदार उभा करून या घटनेचा तपास गुंडाळण्यात आला होता. अशा खोट्या सक्षिदाराला सुद्धा या घटनेचे सह आरोपी करणे गरजेचे आहे. तसेच घटना घडत असताना पहाटे ०१.४२ वा. आरोपीसोबत थेट पुणे येथून फोनवर मार्गदर्शन करणार्या या आरोपींच्या आका ला सुद्धा या घटनेत सह आरोपी करणे गरजेचे असून तसे घडले नाही तर देवळाली प्रवरा येथेही बिड सारखी परिस्थिती निर्माण होईल असे या प्रसंगी बोलताना आप्पासाहेब ढूस यांनी सांगितले.
ढूस यांनी जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांची वेळोवेळी भेट घेवून राहुरीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनेच्या रात्री आप्पासाहेब ढूस यांच्या घरी आलेल्या आरोपींच्या मोबाईल सि.डी.आर. नुसार पोलीसांनी नोटिसा बजावलेल्या त्या सर्व व्यक्तींची चौकशी पूर्ण करण्याची मागणी केली होती. तसेच ढूस यांच्या घराच्या सीसीटिव्ही कॅमेरामध्ये स्पष्ट दिसत असलेल्या व जाळपोळ करून दहशत पसरविणाऱ्या देवळाली प्रवरा सोसायटी मध्ये सध्या संचालक असलेल्या सुधिर विठ्ठल टीक्कल व इतर चार आरोपींवर कारवाई करण्यात यावी अशी वेळोवेळी मागणी करुनही जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी व राहुरीचे पोलीस अधिकारी यांनी त्या पध्दतीने घटनेचा तपास केला नाही. आप्पासाहेब ढूस यांनी त्यांच्या फिर्यादीत सांगूनही एफ आय आर मधून आरोपींची नावे वगळली, तसेच आरोपींची संख्याही कामी दाखविली, तसेच.. घटनेचा पंचनामा करतानाही पंचनामा काय केला हेही ढूस यांना दाखविले नाहीं. त्याचबरोबर खोटा साक्षीदार उभा करून या सर्व आरोपींना राहुरी पोलीसांनी वाचविनेचा प्रयत्न केला.
तसेच मध्यरात्री ढूस यांच्या घराच्या अंगणात ही घटना घडत असताना थेट पुणे येथुन या दहशतवाद्यांच्या आकाचा फोन आल्याचे सीडीआर मध्ये निष्पन्न झालेले असतानाही पुणे येथील त्या आकाचा शोध राहुरी पोलिसांनी घेतला नाही. किंवा त्यास साधे चौकशीला सुद्धा बोलावले नाही.
तसेच या आरोपींनी वापरलेले चार चाकी वाहन पोलिसांनी ताब्यात घेऊन ते कोणाचे आहे याची साधी चौकशी सुद्धा केलेली नाही. किंवा ते वाहणही जप्त केले नाही.
आप्पासाहेब ढूस यांना व त्यांच्या कुटुंबाला जिवंत जाळून मारण्याचा झालेला प्रयत्न का व कशासाठी झाला तसेच त्या घटनेमधील इतर आरोपी कोण होते त्यांना पुण्यामधून घटनेच्या प्रसंगी रात्री ०१.४२ वाजता फोन करणारा त्यांचा *आका* कोण? आणि या सर्व घटनेचा सूत्रधार म्हणजे *आकाचा आका* कोण? हे शोधून काढण्यासाठी आणि या सर्व आरोपींना वाचविण्यासाठी समोर आलेला खोटा साक्षीदार आदी सर्व गोष्टी गावाला माहिती होण्यासाठी आणि देवळाली प्रवरा मध्ये परळी/ बिड सारख्या घटणा घडू नये आणि झुंडशाही निर्माण होऊ नये म्हणून पर्यायाने ढूस यांना राहुरी येथील मे. न्यायालयात धाव घ्यावी लागली.
राहुरी येथील न्यायालयाच्या या आदेशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून न्यायालयाच्या आदेशावर प्रतिक्रिया देताना आप्पासाहेब ढूस यांनी सांगितले की, न्याय देवतेवर आमचा पूर्ण विश्वास असून या घटनेतील इतर चार आरोपी तसेच त्यांनी वापरलेले चार चाकी वाहन व पुणे येथून घटनेच्याप्रसंगी आरोपींसोबत संभाषण करणारा त्यांचा *आका* आणि या सर्व घटनेच्या पाठीशी असलेला सूत्रधार.. म्हणजे त्या *आकाचा आका* उजेडात येईपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे. जेणेकरून देवळाली प्रवरा सारख्या सुंदर शहरात परळी बिड सारखी परिस्थिती निर्माण होणार नाही असे ढूस यांनी सांगितले.