shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

उपक्रमशील शिक्षक रज्जाक शेख (सर) संवादलेखित आणि दिग्दर्शित असलेली


अशी भरली ग्रामसभा' या नाटिकेची जिल्हास्तरावर निवड

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित श्रीरामपूर पंचायत समिती तालुकास्तर सांस्कृतिक स्पर्धा तालुक्यातील अशोकनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.या स्पर्धेतील बालगटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडीच्या विद्यार्थ्यांची 'अशी भरली ग्रामसभा' ही विनोदी आणि प्रबोधनपर ठरणारी नाटिका तालुक्यात पहिली आली.

या नाटिकेचे संवादलेखन आणि दिग्दर्शन उपक्रमशील शिक्षक रज्जाक शेख यांनी केले आहे. ही नाटिका जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी श्रीरामपूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. जिल्हा स्तरावर निवड झाल्याबद्दल श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती साईलता सामलेटी,विस्तार अधिकारी मंगल गायकवाड, केंद्रप्रमुख आंबीलवादे, केंद्रसमन्वयक राजेंद्र केदारी, ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, संचालक आणि शालेय व्यवस्थापन समिती माळेवाडी, शिक्षक बँकेचे चेअरमन बाळासाहेब सरोदे आदींनी अभिनंदन केले. ग्रामसुधारक उपक्रमांना आवश्यक आदर्श ग्रामसभेचे सादरीकरण बालकलाकार सोहम वमने,आर्यन बनसोडे, साई उमाप,यश वमने,अमन शहा ,सत्यजित उमाप, श्रीजीत लबडे, कृष्णा खिलारी, ओमकार ताके, गणेश पवार, आदित्य ठाकरे, विराज ,विराट करपे,आरुषी वमने, ईश्वरी घोडके, ज्ञानेश्वरी ताके,अरबीया शेख, जानवी ठाकरे, पूजा वमने, काव्या औताडे यांनी भूमिका केल्या आहेत. स्पर्धेच्या यशासाठी मुख्याध्यापक अशोक बनसोडे, राजू भालेराव, सारिका लोखंडे, मीरा ससाणे, मीनाक्षी जाधव आणि जयश्री मॅडम यांनी परिश्रम घेतले.

*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close