श्रीरामपूर / प्रतिनिधी:
राज्यातील २०१२ ते २०१९ पर्यंत काम केलेल्या कला , क्रीडा व कार्यानुभव अंशकालीन शिक्षकांना कायमस्वरूपी नियुक्तीसाठी मागील वर्षी सप्टेंबर मध्ये आंदोलन केले होते. तात्कालीन शिक्षण मंत्री आयुक्तांनी विविध मागण्या संदर्भात दिलेली आश्वासने मात्र अजूनही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे कला ,क्रीडा व कार्यानुभव शिक्षक कृती समितीने २० जानेवारी पासून मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत आंदोलन करणार आहे.
राज्यातील १०० पेक्षा कमी पट झालेल्या सर्व शिक्षकांना नेमणूक मिळावी. विस्थापित शिक्षकांना ते ज्या शाळेवर करत होते त्याच शाळेवर नेमणूक मिळावी. नियुक्ती मिळाल्यानंतर ती कायम करणे. आदी संघटनेच्या मागण्या आहेत. अशी माहिती कृती समितीच्या वतीने अध्यक्ष दीपक पवार ,श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज पाटील, सुयोग सस्कर, मोसिन शेख ,दीपक वाघ, राजगुरू सर महिला तालुकाध्यक्ष पवार मॅडम ,यास्मिन पठाण, त्रिभुवन मॅडम, तरकासे मॅडम, वाकचौरे मॅडम यांनी दिली.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111