किरणताई वाघ/ देऊळगाव राजा
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथे जिल्हा उद्योग केंद्र बुलढाणा अंतर्गत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन मेहेत्रे, दत्तात्रय कडू, उद्योग निरीक्षक, जिल्हा उद्योग केंद्र बुलढाणा, गणेश गुप्ता, प्रकल्प अधिकारी, निशा माघाडे उद्योग निरीक्षक, विकास साळवे व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा किरण ठाकरे हे उपस्थित होते.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना राज्य सरकारची नवीन उद्योग उभारणीसाठी व रोजगार निर्मितीची योजना याबद्दल विद्यार्थ्यांना उद्योग निरीक्षक दत्तात्रय कडू यांनी माहिती दिली तर गणेश गुप्ता प्रकल्प अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना कर्ज प्रस्ताव करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे व शैक्षणिक पात्रता याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी शेतीच्या संबंधित असलेल्या विविध उद्योगधंदे भविष्यामध्ये उभारावे असे विद्यार्थ्यांना सांगितले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो सहकार्यक्रम प्रा. अश्विनी जाधव तर आभार प्रदर्शन ऋतुजा वाघ यांनी केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
वृत्त विशेष सहयोग
पत्रकार अजीजभाई शेख - राहाता
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111