एरंडोल - गोरगरिब व गरजू पिडिंत रुग्णाचे "आधारवड" असणारे आरोग्य दूत विक्की खोकरे यांना पुणे येथे राज्यस्तरावर मानाचा मॉ.साहेब "राजमाता जिजाऊ पुरस्कार" मिळाल्याबद्दल त्यांचा एरंडोल येथील दादासाहेब डिगंबर शंकर पाटील महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष अमितदादा पाटील यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व पेन डायरी, देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी,प्राचार्य डॉ.ए जे पाटील उपप्राचार्य प्रा आर एस पाटील, रजिस्टार डॉ.अरविंद बडगुजर, दिनानाथ पाटील सर, शेखर पाटील सर आदी उपस्थित होते.
विक्की खोकरे यांचे कार्य देवरुपी असून त्यांचा अहोरात्र रुग्ण सेवेमुळे अनेकांना जीवनदान मिळाले आहे त्यांचे कार्य हे समाजासाठी फार मोलाचे व प्रेरणादायी असल्याचे यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमितदादा पाटील यांनी व्यक्त केले