सातारा:- जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. सुधाकर करपे यांची सर्दिच्छा भेट घेण्यासाठी संभाजी पुरीगोसावी यांनी भेट दिली. या भेटीत डॉ. करपे यांचा सन्मान करताना त्यांच्या वैद्यकीय सेवेला गौरवण्यात आले. डॉ. करपे यांनी सातारा जिल्हा रुग्णालयाचा पदभार स्वीकारल्यापासून रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
डॉ. सुधाकर करपे यांचा परिचय आणि कार्य...
डॉ. सुधाकर करपे हे मूळचे वाई तालुक्यातील असून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात 23 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव घेतला आहे. त्यांनी आपले एमबीबीएस शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे पूर्ण केले आणि पुढे एमडी (स्त्रीरोग) पदवी कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय, कराड येथून प्राप्त केली.
वैद्यकीय सेवेत योगदान...
डॉ. करपे यांनी ऑगस्ट 2000 मध्ये शासकीय सेवेत प्रवेश केला.सुरुवातीला त्यांनी पिंपोडे येथे आपल्या कारकिर्दीचा प्रारंभ केला.त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांसाठी विशेष कार्य केले.
सातारा जिल्हा रुग्णालयात योगदान...
डॉ. करपे यांनी सातारा जिल्हा रुग्णालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर, रुग्णालयातील सेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्याआधी येथे डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. अमोद गडकरी, आणि डॉ. सुभाष चव्हाण यांनीही उत्कृष्ट सेवा दिली आहे.
रुग्णसेवेतील नवा अध्याय...
डॉ. करपे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा रुग्णालयाने आरोग्यसेवा अधिक गतिमान केली असून, त्यांनी तांत्रिक सुधारणा, नवीन उपचार पद्धती, व अधिकाधिक रुग्णांपर्यंत सेवा पोहोचवण्यावर भर दिला आहे.संभाजी पुरीगोसावी यांनी डॉ. करपे यांच्याशी सुसंवाद साधून त्यांचे कौतुक केले आणि भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.