पळसदल:- शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या प्रथम वर्ष बी. फार्मसी आणि डी. फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी गुरुवार, दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी शैक्षणिक कार्यक्रमाच्या अंतर्गत ग्रामीण रुग्णालय, होलसेल मेडिसिन डिस्ट्रीब्यूटर, आणि पथोलॉजी लॅबोरेटरी, एरंडोल येथे भेट दिली.
भेटीचे उद्दिष्ट...
या भेटीचा मुख्य उद्देश ग्रामीण रुग्णालयातील विविध विभागांच्या कार्यपद्धतींचा अभ्यास करून औषध वितरण प्रक्रिया, पथोलॉजी चाचण्यांचे महत्त्व आणि औषध वितरण साखळी याबद्दल सखोल माहिती मिळवणे हा होता.
ग्रामीण रुग्णालयातील अनुभव...
ग्रामीण रुग्णालयाच्या विविध विभागांची माहिती विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी डॉ.दिपक जाधव यांनी दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना बाह्य रुग्ण विभाग,अंतरंग विभाग,औषध वितरण विभाग,आणि शल्य चिकित्सा विभाग यांची कार्यपद्धती समजावून सांगितली. विद्यार्थ्यांना औषध वितरणाची पद्धत व रुग्णालयीन प्रक्रिया समजावल्या गेल्या.संसर्गजन्य आजारांपासून बचाव यावर डॉ. जाधव यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
होलसेल मेडिसिन डिस्ट्रीब्यूटर अनुभव...
श्री एजन्सी होलसेल मेडिसिन डिस्ट्रीब्यूटरचे संचालक श्री उदय पाटील यांनी विद्यार्थ्यांना औषध वितरण साखळी कशी कार्य करते याची माहिती दिली.होलसेल औषधे कशी रचली जातात, वितरणाचा क्रम व रिटेलर्सपर्यंत पोहोचण्याच्या पद्धतींची सविस्तर माहिती दिली.औषधांचे वर्गीकरण अल्फाबेटिकली व कंपनीनुसार कसे केले जाते याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
पथोलॉजी लॅबोरेटरी अनुभव...
ह्युमन केअर डिअग्नोस्टिकचे संचालक डॉ. रोहित ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना रक्त व लघवी चाचण्यांचे रोगनिदाना साठीचे महत्त्व समजावून सांगितले.पथोलॉजी चाचण्यांचे कार्यप्रणाली व रोगनिदानासाठीचे योगदान स्पष्ट करण्यात आले.
मार्गदर्शन व सहकार्य...
- या शैक्षणिक भेटीसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य डॉ.विजय शास्त्री आणि सचिव सौ.रूपा शास्त्री यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.भेटीच्या आयोजनासाठी उपप्राचार्य डॉ.पराग कुलकर्णी आणि प्रा.जावेद शेख यांचे विशेष योगदान लाभले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.करण पावरा, प्रा. रोशनी पाटील, प्रा. कीर्ती पाटील, प्रा. मयुरी पाटील, प्रा. अनिता वळवी, प्रा. योगेश्वरी लोहार,तसेच जनसंपर्क अधिकारी श्री. शेखर बुंदुले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना औषध शास्त्र, ग्रामीण आरोग्य व्यवस्थापन, औषध वितरण आणि पथोलॉजी चाचण्यांच्या कार्यपद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. यामुळे त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक ज्ञानात भर पडली. शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी च्या या उपक्रमाचे कौतुक विद्यार्थ्यांसह शिक्षण क्षेत्रात सर्वत्र झाले.