shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

केज येथील लक्ष्मी मुंडे नर्सिंग काॅलेजमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी..!


--------------------------------

प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-

केज येथील लक्ष्मी मुंडे नर्सिंग काॅलेज मध्ये शुक्रवार दि.३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. 

केज येथील सिध्दीविनायक शैक्षणिक सेवाभावी संस्था बीड संचलित,




लक्ष्मी मुंडे नर्सिंग काॅलेज मध्ये शुक्रवार दि.३ जानेवारी रोजी साजरी करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले संस्थापक रमाकांत (बापू) मुंडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. या वेळी प्रमुख पाहुणे रमाकांत (बापू) मुंडे यांनी सावित्रीबाई फुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्या विषयी विद्यार्थ्यांशी हितगुज सांगताना म्हणाले की, त्या काळात स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून अंगावर शेण आणि चिखल झेलून स्त्री शिक्षण सुरू ठेवले. खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या शिक्षणासाठी अपार कष्ट आणि अपमान सहन करूनही त्या आपल्या कर्तव्यापासून मागे हटल्या नाहीत किंवा नाउमेद झाल्या नाहीत. म्हणून स्त्रीयांच्या उद्दारकर्त्या या सावित्रीबाई फुले याच आहेत. त्यांच्यामुळेच आज विविध क्षेत्रात स्त्रिया उत्तुंग झेप घेत आहेत. खऱ्या अर्थाने त्यांनी महिलांना शिक्षित करून त्यांना गुलामीतून बाहेर काढले. अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी मधुर भैय्या मुंडे, प्राचार्य रवि पवार, फरदीन पठाण, श्रीमती सोनवणे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थीनी आणि विद्यार्थी उपस्थीत होते.

close