शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
शैक्षणिक बातमी
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापक श्री. सुहास विसाळ, पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ, श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी प्रशालेतील विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांच्या पोशाखामध्ये शाळेमध्ये उपस्थित होत्या. अक्षदा आहेर, जान्हवी ठिकडे, पल्लवी सुतार, साक्षी गावणंग, मयुरी कुठे, सुकन्या येवले, अस्मिता सुतार, दिव्या चव्हाण, दिव्यांशी पांडे, प्रज्ञा जाधव, कृतिका गायकवाड आणि दिव्या सोनवणे विद्यार्थिनींनी त्यानिमित्ताने आपले भाषणे, मनोगते, गाणी व नाट्यछटा सादर केल्या.
कार्यक्रमानिमित्ताने श्री. सुभाष क्षीररसागर आणि श्री. ज्ञानेश्वर बुरांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई यांच्या कार्याची ओळख करून दिली.
मान्यवरांनी आपल्या मनोगत मधून सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू करण्यासाठी ज्योतिराव फुले यांना केलेल्या मदतीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. मुलींची शाळा चालतांना, विद्यार्थिनींना शिकवताना समाजाकडून होणारी अवहेलना, अपमान आणि अन्याय या सगळ्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर सावित्रीबाईंनी लावलेल्या शिक्षणारुपी छोट्या रोपट्याचा आज विशाल काय वटवृक्ष झालेला असल्याचे स्मरण यानिमित्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. धनंजय काळे आणि श्री. योगेश कोठावदे यांनी केले. सूत्रसंचालन श्री. सोमनाथ ढुमणे यांनी केले. फलक लेखन आणि प्रतिमा रेखाटन कला शिक्षक श्री. महेश चोणगे आणि श्री. विक्रम शिंदे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार श्री. विजय रसाळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.