: बार्शी,
सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमीच मोलाचे योगदान देणारे, बार्शी तालुक्यातील भोईंजे येथील ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय महादेगुरव गुरव यांचा श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
दत्तात्रय गुरव हे गेल्या पाच वर्षांपासून गावामध्ये रक्तदान शिबीर घेत आहेत. तसेच सर्वसामान्य, निराधार, गरजू व्यक्तींना शिबिरा मूळे मोठा फायदा झाला आहे. त्यांच्या कार्याची दाखल घेऊन, इंडियन रेडक्रोस सोसायटीचे डॉक्टर दिलीप कराड व प्रशांत बुडूक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.