वाशी, नवी मुंबई केंद्रातून 'न्युटनचा लायन'प्रथम.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : २१ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत वाशी, नवी मुंबई केंद्रातून गुरुकुल द डे स्कूल या संस्थेच्या न्यूटनचा लायन या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच झुपर्झा, कल्याण या संस्थेच्या ठोंब्या ठोंबीची गोष्ट या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे वाशी, नवी मुंबई केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-
दिग्दर्शनः प्रथम पारितोषिक वृशांक कवठेकर (नाटक-न्युटनचा लायन), द्वितीय पारितोषिक रश्मी घुले (नाटक- ठोंब्या ठोंबीची गोष्ट), प्रकाश योजनाः प्रथम पारितोषिक विनोद राठोड (नाटक- न्युटनचा लायन), द्वितीय पारितोषिक शंतनु साळवी (नाटक-वाचवाल का ?), नेपथ्यः प्रथम पारितोषिक वैष्णवी देव (नाटक- न्युटनचा लायन), द्वितीय पारितोषिक संदेश पडवळ (नाटक- रोज हवे नवे नवे), रंगभूषाः प्रथम पारितोषिक श्रृती गणपुले (नाटक- न्युटनचा लायन), द्वितीय पारितोषिक दिपक कुंभार (नाटक- ठोंब्या ठोंबीची गोष्ट) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदकः दिया गीते (नाटक- न्युटनचा लायन) व मानस तोंडवळकर (नाटक-संग बांधे डोर), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे तनिष्का अपणकर (नाटक- शॉटकट), समिक्षा सोनावणे (नाटक- शपथ), हर्षिका वर्तेकर (नाटक- आदिबांच्या बेटावर), रिदीमा सातवे (नाटक-फुलराणी), प्रणती थोरात (नाटक-सरणार कधीत तम), अर्जुन आमडेकर (नाटक- केअर इज), स्वरांग दाबके (नाटक- न्युटनचा लायन), लाभ घुले (नाटक- ठोंब्या ठोंब्याची गोष्ट) धनुष पाटील (नाटक- राखेतून उडाला मोर) अंगद सिनलकर (नाटक-एका माळेचे मणी)
दि. ६ जानेवारी ते ९ जानेवारी, २०२५ या कालावधीत साहित्य मंदिर सभागृह, वाशी, नवी मुंबई येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २३ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून चंद्रकांत सैंदाने, जुई बर्वे आणि विजय शिंगणे यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या बालनाटकांच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.
स्पर्धा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मुख्य समन्वयक राकेश तळगावकर, मुकुंद जोशी, प्रियंका फणसोपकर, सचिन पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.