जळगाव दि. 14 जानेवारी
प्रहार जनशक्ति पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चूभाउ कडू यांचे आदेशाने व प्रदेश प्रमुख अनिलभाउ चौधरी यांच्या हस्ते उत्तर अहिल्यानगर जिल्हा प्रमुख पदी आज दि. १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर नेवासा येथील ज्ञानेश्वर सर्जेराव सांगळे (माऊली) तसेच युवक जिल्हा प्रमुख पदी विधीज्ञ पांडुरंग केशव औताडे यांची निवड निश्चित करून त्यांना आज निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी झालेल्या छोट्या खाणी का
र्यक्रमात बोलताना नूतन जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर सांगळे व पांडुरंग औताडे यांनी सांगितले की, काल दि. १३ जानेवारी अखेर असलेली जुनी जिल्हा कार्यकारीनी बरखास्त करण्यात येत असून नूतन कार्यकारिणीची लवकरच सर्वांनुमते निवड करण्यात येईल.
प्रसंगी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्र प्रमुख अप्पासाहेब ढूस यांनी बच्चुभाऊ कडू यांचे मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या हस्ते आज जिल्हा प्रमुख पदी ज्ञानेश्वर सांगळे यांची व युवा जिल्हाप्रमुख पदी पांडुरंग औताडे यांची निवड केल्याबद्दल हार्दिक आभार व्यक्त करून जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या दोन्ही जिल्हा प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने काम करतील व एक दिलाने संघटना वाढवतील असे आश्वासन देऊन आभार व्यक्त केले. सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी सरपंच बाळासाहेब खर्जुले, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस, जालिंदर आरगडे पाटील, नागनाथ आगळे पाटील, प्रकाश वाकळे पाटील, मेजर गोपी उगले, संदीप पाखरे, अरविंद आरगडे पाटील, सचिन साबळे, गजानन सांगळे, विशाल शिरसाठ आदी उपस्थित होते.