सोनई;-
शनिशिंगणापूर,शनिवार दि. 25 जानेवारी 2025...
वडार एकता परिषद ची जिल्हास्तरीय बैठक उत्साहात पार पडली..
नवीन विचार,नवा जोश,आणि नवी तयारी या तत्त्वानुसार वडार एकता परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.समाजातील मागे पडलेल्या प्रश्नावर विशेष चर्चा करण्यात आली. समाज एकत्रित असल्याशिवाय
समाजाला न्याय मिळणार नाही. त्यासाठी आत्ताचा विचार सोडून पुढील पिढीसाठी एकत्र येण्याची गरज आहे. असे कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
यावेळी शिवाजी ननावरे,रमेश जेठे(सर),कृष्णामहाराज मोहिते,संदिप कुसळकर,भोरूभाऊ म्हस्के, अंबादास साळुंखे, माणिक विटेकर,आदींनी मार्गदर्शन केले.
वडार एकता परिषदेचा झेंडा..
रंगाने लाल असणारा झेंडा हा क्रांतिकारकाच्या विचाराचा प्रतीक..
झेंड्यामध्ये ब्रीदवाक्य जय बजरंग...जय वडार..
वडार एकता परिषदेची धारणा आहे की..
बजरंग हे वडार समाजाचे आद्य पुरुष...
एकता परिषदेच्या झेंड्यामधील चाक ज्या चाकाचा शोध वडार समाजाने लावला... या चाकाच्या आधारे पुढे वडार समाज हजारो वर्ष एका गावावरून दुसऱ्या गावी फिरस्ती जीवन जगत आहे..
आणि म्हणून काल शनिशिंगणापूर या ठिकाणच्या बैठकीमध्ये वडार समाजाला दिशा देईल,
वडार समाजाचा सन्मान वाढेल,
वडार समाजामध्ये एकता निर्माण करेल असा झेंडा या बैठकीमध्ये प्रकाशित करण्यात आला..
या बैठकीला जिल्ह्यातून मान्यवर वडार बांधव सहभागी झाले, चर्चेत सहभाग घेतला आणि अतिशय सखोल विचार विनिमय करून संघटनेचे ध्येय, धोरण,उद्दिष्ट समजून घेऊन संघटना समाजाच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला..
मा.भरत विटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत जिल्ह्यातून रामचंद्र मंजूळे,शिवाजी ननावरे रमेश जेठे,संदीप कुसाळकर, बोरु शेठ मस्के, तुकाराम पवार,, दिगंबर पवार, एडवोकेट विनोद लष्करे, हनुमंत धनवडे, गोरक्षनाथ कुऱ्हाडे साहेब, संपत गायकवाड, प्रदीप मोहिते, बबीता ताई,गुंजाळ, सुनिता धनवडे, नंदा कुसाळकर ताई, अंबादास साळुंखे, पंडित मुरकुटे, महादेव अळकुंटे, माणिक विटकर, कृष्णा महाराज मोहिते, सागर कुसमुडे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीमध्ये वडार समाजाचे प्रश्न तडीस लावण्याच्या संदर्भात पुढील रणनीती निश्चित करून समाज मध्ये एकता निर्माण करण्याचा निश्चय करण्यात आला.
वडार एकता परिषदेची पहिली बैठक दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी तुळजापूर येथे पार पडली आणि आज ही दुसरी बैठक शनिशिंगणापूर येथे संपन्न झाली ...असाच पुढील बैठकांचा सिलसिला महाराष्ट्रभर कायम ठेवण्याचा सर्व सभासदांनी निश्चय करून बैठक संपल्याचे जाहीर केले..