प्रहार संघटना कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार.
राहुरी फॅक्टरी - १७ जानेवारी
डॉ. बा. बा. तनपुरे सह साखर कारखाना कामगारांच्या प्रश्नावर कारखाना कार्यस्थळावरील लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये १७ जानेवारी २०२५ रोजी सकाळीं १०.३० वा. सेवानिवृत्त कामगार सोमनाथ वाकडे यांचे अध्यक्षतेखाली कामगारांची बैठक संपन्न.
प्रसंगी प्रहार चे आप्पासाहेब ढूस, कामगार नेते चंद्रकांत कराळे, रफिक सय्यद, भाऊसाहेब आल्हाट, भास्कर कोळसे, सुनील तनपुरे, उत्तम साळवे, नारायण चव्हाण, सोपान कोहकडे, फकीरा कदम, गणपत बेलकर, वत्सला बोरुडे आदी प्रमुख कामगारांसह जवळपास 70 ते 80 कर्मचारी या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीमध्ये कामगारांच्या मुख्य मागण्यांसह प्रास्ताविक करताना चंद्रकांत कराळे यांनी सांगितले की कामगारांच्या प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी, थकीत पगार इत्यादी बाबत कामगारांना मोठ्या अडचणी आहेत हे काम कामगारांच्या संघटनेने सोडविणे अपेक्षित असताना संघटना यात लक्ष घालित नसल्याने कामगारांना एकीकरण समितीची स्थापना करावी लागली व त्या माध्यमातून स्वतःच्या हक्कासाठी लढा उभा करण्याची वेळ या ठिकाणी येऊन ठेपले असल्याने सर्वांनी एकजुट दाखविणे गरजेचे आहे.
या बैठकीत बोलताना प्रहार संघटनेचे आप्पासाहेब ढूस म्हणाले की, कारखाना बंद असल्याने प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाकडून कामगारांच्या प्रॉव्हिडंट फंडातील दहा टक्के ठेवून घेतले जाते व ही रक्कम जवळपास सात ते आठ कोटी रुपये होत असल्याने तसेच कामगारांच्या सेवानिवृत्तीच्या अटींची पूर्तता मध्ये अडचणी येत असल्याने या सर्वच अडचणींची सोडवणूक करण्यासाठी प्रहार संघटना कामगारांच्या पाठीशी उभे राहणार आहे व प्रॉव्हिडंट फंडाचे अडकलेले दहा टक्के रक्कम त्याचबरोबर फंड पेन्शन यामध्ये दलाचा असलेला हस्तक्षेप थांबून कामगारांना न्याय मिळवून देण्यात येईल. त्याचबरोबर कामगार संघटनेच्या ट्रेड युनियन कायद्यातील तरतुदींच्या उल्लंघनामुळे संघटने कडून झालेल्या आर्थिक व्यवहारांच्या प्रश्नांवर लक्ष घालून कामगारांना त्यांचा हक्क प्रहार कडून मिळवून देण्यात येईल. वेळप्रसंगी या प्रहार संघटना कामगारांसाठी कायदेशीर लढा लढेल व त्यांना न्याय मिळवून देईल अशी ग्वाही प्रहार च्या वतीने ढूस यांनी दिली.
या बैठकीमध्ये रफिक सय्यद भाऊसाहेब आल्हाट वत्सला बोरुडे आदींनी मनोगत व्यक्त केले. व सुनील तनपुरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.