प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-
आज केज शहरातील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जीवन विकास शिक्षण मंडळाचे सचिव श्री. गदळे सर होते.उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. अंकुश इंगळे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.
पाहुण्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री. कोकीळ सर व श्री. विनोद गुंड तालुका क्रीडा संयोजक यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना या शाळेचे खेळाडू राज्य राष्ट्रीय स्पर्धत सहभागी व्हावे अशी आशा व्यक्त केली. या वेळी विद्यार्थी यांनी संचलन केले व खेळाडूनी स्पर्धेची शपथ घेतली. या कार्यक्रमात विविध तालुकास्तर व जिल्हास्तरीय खेळाडूंना प्रशस्तीपत्र व मेडल देण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जाधव मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विनोद गुंड यांनी केले या क्रीडा स्पर्धत कब्बडी ,खो खो, योगा, बुध्दिबळ, रोपजंम्प, बॅडमिंटन, या स्पर्धा 20 जानेवारी व 21 जानेवारी या दोन दिवस चालणार आहेत. या स्पर्धेसाठी सौ तपसे मॅडम, सौ विटेकर मॅडम,सौ कल्याणकर मॅडम, सौ लोखंडे मॅडम, श्री वाघमोडे सर , सौ. काळे मॅडम , सौ चोले मॅडम , सौ कापसे मॅडम, सौ हंडीबाग मॅडम, सौ सावंत मॅडम, सौ पालवे मॅडम, शिक्षक व शिक्षका व तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी मेहनत घेत आहेत.