*ऊस तोडणी महिला कामगारांच्या जीवनात रंग भरत, डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात साडी वितरण!
*प्रवरा परिसरात डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त ऊस तोडणी कामगारांना मदतीचा हात!
अकोले:प्रतिनिधी,
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस आणि दैनिक समर्थ गांवकरी चे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यानिमित्त प्रवरा परिसरातील ऊस तोडणी महिला कामगारांना साडी व विविध साहित्याचे वितरण करण्यात आले.
हा कार्यक्रम अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. वितरणाच्या वेळी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संचालिका सौ. परीघा विश्वासराव आरोटे, वैशालीताई महाले, अस्मिताताई मालुंजकर, अनिता कुसळकर, अर्णव कुसळकर, आणि कुमारी आयंती मालुंजकर यांची उपस्थिती होती.
याशिवाय अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी सतीशराव देशमुख, इंदोरी गटातील शेतकी अधिकारी संचित नवले, पांडुरंग आरोटे, नथुराम राठोड, साईनाथ आरज, शेतकी मदतनीस प्रवीण आवारी, भीमाशंकर घुले, रमाकांत आग्रे, व नवनाथ तिटमे यांसह गटातील सर्व अधिकारी आणि कर्मचारीवृंद उपस्थित होते.
हा कार्यक्रम प्रवरा परिसरातील मेहेंदुरी, म्हाळदेवी, पिंपळगाव, शेरणखेल, निळवंडे, विठे, चितळवेढे या गावांमध्ये मोठ्या संख्येने आयोजित करण्यात आला. या उपक्रमामुळे ऊस तोडणी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक सर्वत्र होत आहे.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111