shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

एरंडोल महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम विविध कार्यक्रमांनी संपन्न.

एरंडोल महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम विविध कार्यक्रमांनी संपन्न.

एरंडोल : येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात दिनांक १ ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन संस्था अध्यक्ष श्री. अमित पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील, डॉ. अरविंद बडगुजर, तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. जगदीश पाटील (अधिष्ठाता, मानवविद्या विभाग, कबचौ उमवी, जळगाव), डॉ. बी. एन. केसुर (अध्यक्ष, इंग्रजी अभ्यास मंडळ, कबचौ उमवी, जळगाव), डॉ. हेमंत कुमार, डॉ. व्ही. पी. चौधरी, डॉ. लीलाधर पाटील आणि श्री. रंजन गुप्ता (केब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, महाराष्ट्र विभाग प्रमुख) उपस्थित होते.  
एरंडोल महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम विविध कार्यक्रमांनी संपन्न.

कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागामार्फत करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.  

एरंडोल महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम विविध कार्यक्रमांनी संपन्न.

उपक्रमातील प्रमुख कार्यक्रम.

1. ग्रंथप्रदर्शन. 

   ३० व ३१ डिसेंबर २०२४ रोजी महाविद्यालयात दोन दिवसीय ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले. विविध प्रकारच्या पुस्तकांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी खुले ठेवण्यात आले होते.  

2. सामूहिक वाचन आणि कार्यशाळा.

   ३ जानेवारी २०२५ रोजी सामूहिक वाचन व वाचन कौशल्यावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.  

3. पुस्तकांच्या बगीच्याला भेट.

   ७ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांनी आनंदनगर येथील नगर परिषदेच्या पुस्तकांच्या बगीच्याला भेट दिली. त्यांनी तेथील ग्रंथालयातील पुस्तकांचा आस्वाद घेतला.  

4. सार्वजनिक वाचनालय भेट.

   ९ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांनी कै. बळवंत विष्णू विसपुते सार्वजनिक वाचनालयाला भेट दिली. वाचनालयाचे अध्यक्ष मा. सचिन विसपुते यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  

5. पुस्तक परीक्षण स्पर्धा.

   दिनांक १ ते १५ जानेवारीदरम्यान पुस्तक परीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या स्पर्धेत १८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांक हर्षल रवींद्र पाटील यांना, तर द्वितीय क्रमांक चैताली सरदार पाटील यांना मिळाला. परीक्षणासाठी प्रा. ए. टी. चिमकर, डॉ. एन. एस. तायडे, आणि डॉ. स्वाती शेलार यांनी परीक्षक म्हणून योगदान दिले.  

उपक्रमाची सांगता...

१६ जानेवारी २०२५ रोजी या उपक्रमाची सांगता झाली. यावेळी प्रा. एन. ए. पाटील, डॉ. एन. व्ही. दांडेकर, प्रा. डॉ. एच. एम. पाटील, प्रा. आर. एस. पाटील, प्रा. एन. बी. गायकवाड, प्रा. जे. व्ही. पाटील, प्रा. एस. ए. राणे, प्रा. उमेश सूर्यवंशी, दिनेश पवार, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली.  

कार्यक्रमाची यशस्वीता...

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS), विद्यार्थी विकास विभाग, आणि एनसीसी विभागाने विशेष मेहनत घेतली. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले असून विद्यार्थ्यांनी वाचनाची गोडी लावल्याबद्दल महाविद्यालय प्रशासनाचे कौतुक करण्यात आले.

close